Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ दीपिकाशी लग्न?? जाणून घ्या, काय म्हणाला रणवीर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 21:25 IST

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या लग्नाच्या चचेर्नेही जोर धरला ...

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या लग्नाच्या चचेर्नेही जोर धरला आहे.   ही हॉट जोडी पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. चर्चा म्हटल्यावर रणवीर वा दीपिकाला या प्रश्नाला सामोर जावे लागणारच. मग काय, सर्वात आधी रणवीरच सापडला. दीपिकासोबतच्या लग्नाबाबत थेट त्याचाल विचारण्यात आले. यावर रणवीरने काय उत्तर दिले माहितीय??   ‘अरे क्या बात कर रहे हो यार, सुबह सुबह निंद भी पूरी नही हुई है. अब आया हू तो पता चलेगा’असे तो म्हणाला. रणवीरच्या या प्रतिक्रियेत आपला साखरपूडा आणि लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचा रोख होता. त्यामुळे या दोघांच्या साखरपुड्याच्या किंवा लग्नाच्या वृत्तात किती तथ्य आहे, हे तूर्तास तरी गुलदस्त्यात आहे. आता पुढे काय होते, ते बघूयात!