Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आधी सोनम कपूरसाठी आनंद अहुजला करावे लागले हे काम, त्यानंतर चढला बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 13:57 IST

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले. हे या वर्षी सगळ्यात मोठं लग्न आहे असे ...

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले. हे या वर्षी सगळ्यात मोठं लग्न आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुढच्या काही मिनिटात सोनम कपूर मिसेस अहुजा झालेली असेल. सोनम आणि आनंदच्या लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सोनम आणि आनंद एकमेकांना गेल्या 4 वर्षांपासून डेट करतायेत. आज दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जाणार आहेत. गेल्या 2 दोन दिवसांपासून सोनमच्या हळदी आणि संगीत सेरेमनीची धूम होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटींनी संगीत सेरेमनीला हजेरी लावून चार चाँद लावले होते. सोनमचे जवळचे मित्र-मौत्रिणींनी सोनमच्या संगीत सेरेमनीमध्ये ठुमके लावत खूप मस्ती केली. सोनमची मेहंदी स्पेशल बनवण्यासाठी आनंदने फक्त सोनम कपूरसोबत डान्सच नाही केला तर त्यांने आपल्या हातावर मेहंदी लावली. सोनमसाठी आनंदने आपल्या हातावर मेहंदी लावली. याचाच अर्थ आनंद सोनमच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करतो. सोनम आणि आनंदच्या लग्नाच्या विधी सुरु झालेल्या आहेत.अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी लग्नाच्या वेन्युवर पोहोचल्या आहेत. अमिताभ बच्चन, करिना कपूर खान, सैफ अली खान, तैमूर खान, करिश्मा कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि स्वरा भास्कर यांनी खास अंदाजात सोनमच्या लग्नात हजेरी लावली आहे. ALSO READ :  सोनम कपूरच्या लग्नात स्टायलिश अंदाजात अवतरला छोटा नवाबलग्नानंतर सोनमला लगचेच हनीमूनला जाता येणार नाही आहे. कारण सोनमच्या प्रोफेशनल कमिटमेंट्स आणि बिझी शेड्यूलमुळे त्यांना हनीमूनला जायला बराच कालावधी लागणार आहे. सोनम कपूरला 14 मे रोजी होणाऱ्या कॅन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामिल व्हायचे आहे. दरवर्षी प्रमाणे सोनम याही वर्षी आपल्या हटके अंदाजात रेडकार्पेटवर हजेरी लावणार आहे. यानंतर त्याला चित्रपटाचे प्रमोशन आणि शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ऑक्टोबर किंवा  नोव्हेंबरमध्ये ती हनीमूनला जाणार आहे.