Join us
Daily Top 2Weekly Top 5

मरामोळा हृषिकेशचं हाऊसफुल -3 गाणं सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:39 IST

अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस यांची भूमिका असलेल्या हाउसफुल ३ सिनेमाच्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.सिनेमातील ...

अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस यांची भूमिका असलेल्या हाउसफुल ३ सिनेमाच्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.सिनेमातील 'टाँग उठा के' हे गाणं यूट्यूब वर हिट ठरतंय या सिनेमातील गायक हृषिकेश चुरीचे हे गाणे अतिशय लोकप्रिय झाल्यामुळे फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर त्याचा प्रचंड चाहतावर्ग वाढला आहे. हृषिकेश चुरी हा मुंबई चा महाराष्ट्रीयन मुलगा असून एक प्रशिक्षित गायक आहे. अलीकडेच त्याने झी सारेगमप २०१६ मुंबई ऑडीशन च्यावेळी जज म्हणून काम पाहिले होते.गाण्याला मिळालेल्या प्रचंड यशामुळे त्याने पुढे येऊन, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी कोणत्याही दुष्काळ मदत निधी कॉन्सर्ट साठी मी विनामूल्य परफॉर्म करणार असल्याची हृषिकेशनं म्हटलंय.