घटस्फोटानंतर मलायका-अरबाजची पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 09:35 IST
आपण नुकतेच वाचले की, अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी घटस्फोटाच्या संदर्भात जॉर्इंट स्टेट
घटस्फोटानंतर मलायका-अरबाजची पार्टी!
आपण नुकतेच वाचले की, अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी घटस्फोटाच्या संदर्भात जॉर्इंट स्टेटमेंट दिले आहे. त्यांनी घटस्फोटाच्या मसुद्यावर सांगितले आहे की,‘ सत्य तर हे आहे की, आम्हाला थोडा ब्रेक हवाय, पण याचा अर्थ हा नाही की, लोकांनी लगेचच आम्ही वेगळे झालो असा अर्थ काढावा.आम्हाला एकमेकांच्या लाईफस्टाईल आणि जीवनप्रणाली समजून घ्यावयाची आहे. हो हे खरं आहे की, आम्ही वेगळे झाला आहोत. पण आम्हाला जिथेही वाटले की आम्ही पुन्हा एकत्र आले पाहिजे. तेव्हा आम्ही विचार करू.’ मलायकाची बहीण अमृताने एक फॅमिली पिक्चर सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला आहे.यात मलायका, अरबाज, अमृता, शकील, सोहेल, सीमा हे दिसत आहेत. अमृताने या फोटोला ‘गुड टाईम्स’ असे नाव दिले होते. तिने अगोदर याचे कॅप्शन,‘ देअर इज नो सच थिंग अॅज अ ‘ब्रोकन फॅमिली..’ फॅमिली इज फॅमिली.’ हे माहिती नाही की, अमृताने कॅप्शन का बदलले?