Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही मराठमोळी अभिनेत्री आहे अशिक्षित, पण संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला येईल चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:39 IST

Rakhi Sawant's Property : ही मराठमोळी अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

बॉलिवूडची कॉन्ट्रॉव्हर्शिएल क्वीन म्हणजेच अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. भलेही तिच्याकडे काम नसलं तरीदेखील तिला चर्चेत कसे रहायचे हे चांगलंच माहित आहे. राखीची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी राखीकडे आज कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीइतकाच पैसा आहे. इतकंच नाही तर ती अशिक्षित असूनही तिने मुंबईत १० कोटींची प्रॉपर्टी विकत घेतली आहे.

राखी सावंतने २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा तिने तिची शैक्षणिक माहिती दिली होती. त्यात तिने म्हटले होते की ती अशिक्षीत आहे. राखीने स्वतःची राष्ट्रीय आम पार्टी स्थापन करुन ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यावेळी तिने तिची संपत्ती १४.७ कोटी असल्याचे जाहीर केले होते. 

राखीने ४ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार तिच्याकडे २१.६ लाखांची फोर्ड एंजेव्हर कार आहे. राखीकडे साडे सात लाखांची ज्वेलरी आणि ५३ लाख रुपये बँक बॅलेन्स आहे. 

राखी सावंतचे वडील आनंद सावंत हे मुंबई पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुबंईत तिची आई जया यांच्यासोबत राहते. राखीने मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला खरेदी केला आहे. या सर्वांची मिळून एकूण किंमत ११ कोटी रुपये आहे. तिच्या एका बंगल्याची किंमत १.३२ कोटी रुपये आहे आणि इथेच तिचे ऑफीस आहे. मुंबईत एका कॉम्पलॅक्समध्ये तिचा ७ कोटींचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने २०१२ मध्ये खरेदी केला आहे. याशिवाय ओशिवरा बस डेपोच्या जवळील इम्पीरियल हाइट येथे २.८ कोटींचा दुसरा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने २००२ मध्ये खरेदी केला होता.

राखीने जिस देश में गंगा रहता है, मैं हूँ ना, दम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ती कधीच महत्त्वाच्या भूमिकेत झळकली नाही. बिग बॉस या कार्यक्रमात देखील तिने हजेरी लावली होती.

तिला खरी लोकप्रियता बिग बॉस, नच बलिये, राखी का स्वयंवर यांसारख्या कार्यक्रमांमुळे मिळाली. राखीला बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :राखी सावंत