Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दीड रूपयांसाठी बुट पॉलिश करायची ही मराठमोळी अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 12:37 IST

 लवकरच ही मराठमोळी अभिनेत्री नेटफ्लिक्सवर येणा-या ‘बाहुबली’ या वेब सीरिजमध्येही शिवगामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ठळक मुद्दे‘कुमकुम भाग्य ’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेत प्रज्ञाची लहान बहीण बुलबुलची भूमिका साकारणारी मृणाल सुपर 30’ मध्ये ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिकेत दिसली.

हृतिक रोशनचासुपर 30’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री भाव खाऊन गेली. ही अभिनेत्री कोण तर मृणाल ठाकूर. ‘कुमकुम भाग्य ’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेत प्रज्ञाची लहान बहीण बुलबुलची भूमिका साकारणारी मृणाल सुपर 30’ मध्ये ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिकेत दिसली. विश्वास बसणार नाही पण  पॉकेटमनी मिळवण्यासाठी हीच मृणाल कधीकाळी वडिलांचे बूट पॉलिश करायची.  एका चॅट शोदरम्यान खुद्द मृणालने ही माहिती दिली.

 चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची मला फार आवड होती. त्याकाळात पॉकेटमनीसाठी  थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे. शिवाय वडिलांचे बूट पॉलिश करायचे. वडिलांचे बूट पॉलिश केल्यावर मला दीड रुपये मिळायचे. पण ही काम करण्यातसुद्धा एक वेगळीच मजा होती, असे तिने यावेळी सांगितले.

 लवकरच मृणाल नेटफ्लिक्सवर येणा-या ‘बाहुबली’ या वेब सीरिजमध्येही शिवगामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.  मृणाल ठाकूर हिने आमिर खानच्या ‘ठग्स  ऑफ हिंदुस्तान’मध्ये काम करण्यास नकार दिला होता. आमिर खानला मृणालला फातिमा सना शेखची भूमिका द्यायची होती. मात्र काही कारणामुळे तसे होऊ शकलेनाही.  सलमान खानचा चित्रपट ‘सुल्तान’साठी सुद्धा तिने  ऑडिशन दिले होते. मात्र ऐनवेळी मेकर्सनी या चित्रपटासाठी अनुष्का शर्माला साईन केले.  ‘लव सोनिया’ या चित्रपटात मृणालने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

टॅग्स :हृतिक रोशनसुपर 30