Girija Oak: बॉलिवूडचा किंग खान अशी उपाधी लाभलेला अभिनेता शाहरुख खानचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत.शाहरुखच्या केवळ अभिनयाचं नाहीतर त्याच्या स्वभावाचं देखील अनेकजण कौतुक करत असतात.२०२३ साली आलेल्या जवान या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकने (Girija Oak) शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केली होती.दरम्यान, एका मुलाखतीमध्ये जवान सिनेमात शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता. तो सेटवर कसा वागायचा याविषयी गिरीजाने खुलासा केला आहे.
'जवान'मधील गर्ल गँगमध्येच गिरीजाही एक होती. गिरीजाने सिनेमात जबरदस्त अॅक्शनही केली आहे. जवान चित्रपटावेळी शाहरुखचा मुलगा आर्यनचं ड्रग्ज केस प्रकरण सुरु होतं.त्या काळात शाहरुख आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एका कठीण परिस्थितीतून जात होतं. नुकतीच गिरिजा ओकने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जवान सिनेमाच्या काही आठवणी शेअर केल्या. तेव्हा गिरीजा म्हणाली,"माझ्या शाहरुखसोबतच्या खूप आठवणी आहेत. या चित्रपटासाठी आम्ही जवळपास दोन वर्ष शूट केलं. आमची प्रत्येकाची नाईट शिफ्ट चालू असायची."
यादरम्यान, गिरीजाने सांगितलं की ती सेटवर सहकलाकार प्रियामणिसोबत अशी चर्चा चालू होती. नाईट शिफ्टमुळे आपल्या मुलाला भेटता येत नाही.यावेळी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. तो भावुक किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली,"शाहरुखने आमचं बोलणं ऐकलं आणि तो म्हणाला," मलाही माझ्या मुलांना भेटता येत नाही. मी जेव्हा घरी जातो तेव्हा अबराम झोपलेला असतो आणि सकाळी घरातून निघतो तेव्हा तो शाळेत गेलेला असतो.इतकंच नाहीतर मला सुहाना आणि आर्यनला सुद्धा भेटता येत नाही. आर्यन तर त्याच्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे मला त्यांनाही भेटता येत नाही, याचं मलाच वाईट वाटतंय.यामुळे मी सुहानाला सेटवर भेटायला बोलावलं आहे."
जवानच्या शूटिंगवेळी आर्यन खानची केस सुरु होची.त्यावेळी शाहरुख खान आपल्या मुलाच्या टेन्शनमध्ये असायचा शिवाय तो मनातील कोणतीही गोष्ट शेअर करत नव्हता.तिने सांगितलं,"मी शाहरुखसोबत काम करत होते तो काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. याचवेळी आर्यनची केस चालू होती.शिवाय त्यादरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी देखील शाहरुखच्या त्या कृतीमुळे वाद झाला होता.यामुळे त्याला खूप काही सहन करावं लागलं. मात्र, तरीही तो कधीच अस्वस्थ आहे, असं वाटलं नाही. मला माहितीये त्याच्या मनात असंख्य विचार सुरु होते पण याचा त्याने कधीच त्याचा कामावर परिणाम होऊ दिला नाही."
३-४ महिने कोणत्याही इव्हेंटला गेला नाही अन्...
"जेव्हा केस सुरु होती तेव्हा शाहरुखने ३-४ महिने कोणत्याही इव्हेंटला गेला नाही. तसंच त्याने जवानचं शूटिंगही करत नव्हता. त्यानंतर तो कोणाच्याही संपर्कात नव्हता.पुन्हा शूटिंग सरु झाल्यानंतर आम्ही मग त्याला भेटलो. पण, तेव्हा केस संपली होती आणि तो अगदी पूर्वी जसा होता तसाच होता." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
Web Summary : Girija Oak revealed Shah Rukh Khan's emotional state during his son Aryan's drug case, noting his dedication to work despite personal struggles and limited contact with his children.
Web Summary : गिरिजा ओक ने आर्यन के ड्रग मामले के दौरान शाहरुख खान की भावनात्मक स्थिति का खुलासा किया, उन्होंने व्यक्तिगत संघर्षों के बावजूद काम के प्रति समर्पण और अपने बच्चों के साथ सीमित संपर्क का उल्लेख किया।