Join us

दीपा परबच्या हिंदी सिनेमाची घोषणा, मुख्य भूमिकेत झळकणार; शेअर केलं पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:48 IST

दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्या हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत

'बाईपण भारी देवा' या गाजलेल्या मराठी सिनेमात झळकलेली अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab).  दीपा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. रंगभूमीवरुन तिने अभिनयाला सुरुवात केली. नंतर अभिनेता अंकुश चौधरीशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा झाला. या सगळ्यात दीपाने अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र 'बाईपण भारी देवा' सिनेमा आणि 'तू चाल पुढं' या मालिकेतून तिने दमदार कमबॅक केलं. आता दीपा थेट हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा केली आहे. 'फकिरीयत' असं सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'जहाँ खतम होती है जरुरत, वही से शुरु होती है फकिरीयत' असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अनुजा जानवळेकर यांच्या 'चिरुट जलती है' आणि 'अध्यात्म: एक विद्रोह, एक क्रांती' या पुस्तकावर सिनेमा आधारित आहे. लवकरच सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सिनेमात अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत आहे. गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांची ती भूमिका साकारणार आहे. अनिल पवार यांनी सिनेमाचा स्क्रीनप्ले लिहिला असून भद्रबाहू क्रिएशन्स यांनी सिनेमाची प्रस्तुती आणि निर्मिती केली आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताबॉलिवूड