Join us

'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:04 IST

Sholey Movie : 'शोले' चित्रपट प्रदर्शित होऊन ५० वर्षे झाली आहेत, या चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से खूप प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटातील त्या अभिनेत्याबद्दल सांगत आहोत, ज्याला त्याच्या कामाच्या बदल्यात पैशाऐवजी रेफ्रिजरेटर देण्यात आला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपट 'शोले' (Sholey Movie) प्रदर्शित होऊन ५० वर्षे झाली आहेत. ५० वर्षांनंतरही या चित्रपटाची कथा आणि किस्से खूप प्रसिद्ध आहेत. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच या चित्रपटाची खूप झाली होती, जी आठ वर्षे चालू होती. हा चित्रपट केवळ त्याच्या कथा, अ‍ॅक्शन आणि संवादांसाठीच नाही तर त्याच्याशी संबंधित अनेक मनोरंजक किस्स्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. चित्रपटाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एका इंटरेस्टिंग किस्सा सांगत आहोत. खरंतर, शोलेतील एका अभिनेत्याला भूमिका साकारण्यासाठी मानधन म्हणून पैसे देण्यात आले नव्हते, तर त्याला रेफ्रिजरेटर देण्यात आला होता.

'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या कलाकारांनी मिळून हा चित्रपट अमर केला. चित्रपटातील सर्व स्टार्सनी उत्तम अभिनय केला. या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही एक छोटी पण संस्मरणीय भूमिका केली होती. 'शोले' चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी अहमद नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती, जो व्हीलचेअरवर बसलेल्या एका वृद्ध माणसाचा नातू होता. या भूमिकेसाठी त्यांना मोठी रक्कम फी म्हणून देण्यात आली नव्हती, तर एक रेफ्रिजरेटर देण्यात आला होता. आजच्या काळातील लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण त्या काळात कलाकारांना पैशाच्या बदल्यात वस्तूही दिल्या जात होत्या.

'शोले' चित्रपटात सचिन पिळगावकर यांची भूमिका खूपच लहान होती. चित्रपटातील त्यांची भूमिका फक्त एकाच दृश्यात होती. या दृश्यात त्यांनी इतके उत्तम काम केले की लोकांना त्यांचा चेहरा अजूनही आठवतो. त्यांची भूमिका जरी लहान असली तरी त्यांनी ती संस्मरणीय केली. सचिन पिळगावकर यांनी 'शोले' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात फक्त रेफ्रिजरेटरसाठी काम केले आणि त्या चित्रपटाचा भाग बनले. आजही लोकांना त्यांचा सिनेमातला अभिनय आठवतो.

टॅग्स :सचिन पिळगांवकरअमिताभ बच्चनधमेंद्र