Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर पत्नी मान्यता म्हणाली, 'देवा पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 15:12 IST

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात आहे. यावर संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, मान्यताने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात तिने संजय  दत्तसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

रिपोर्टनुसार मान्यता म्हणाली, '' मी त्या सगळ्यांची आभारी आहे जे संजय दत्त बरा होण्यासाठी प्रार्थना करतायेत. या परिस्थितीत आम्हाला आपल्या प्रेमाची आणि प्रार्थनेची आवश्यकता आहे. आमच्या कुटुंबाने गेल्या काही वर्षांत कठीण प्रसंगाना तोंड दिले आहे, मात्र आम्हाला आशा आहे की, आम्ही ही लढाईसुद्धा नक्कीच जिंकू. मी चाहत्यांना सांगू इच्छिते की, अफवांवर विश्वास ठेवू नका, संजू नेहमी लढवय्या राहिला आहे आणि आमचे कुटुंबही. देवाने पुन्हा आमची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या सगळ्यांचा प्रार्थना आणि आर्शीवादच्या जोरावर आम्ही नक्कीच जिंकू. 

याआधी संजय दत्तने चाहत्यांना सोशल मीडियावर एक मेसेज दिला होता, 'मित्रांनो, मी वैद्यकीय उपचारांसाठी थोडा ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि माझा मित्र परिवार माझ्यासोबत आहे. माझी काळजी करू नका असं आवाहन मी माझ्या हितचिंतकांना करतो. तुमचं प्रेम आणि तुमच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच परतेन,'. 

टॅग्स :संजय दत्त