अनेकांनी रणवीर सिंगला दिला होता ‘पद्मावती’ साईन न करण्याचा सल्ला! वाचा, रणवीरचा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:39 IST
अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. निश्चितपणे ‘पद्मावती’ हा रणवीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर पहिल्यांदा ...
अनेकांनी रणवीर सिंगला दिला होता ‘पद्मावती’ साईन न करण्याचा सल्ला! वाचा, रणवीरचा खुलासा!!
अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. निश्चितपणे ‘पद्मावती’ हा रणवीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर पहिल्यांदा निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. ही भूमिका रणवीरसाठी मोठी रिस्क होती आणि आहे. त्यामुळेच एका सीनिअरमोस्ट अभिनेत्याने रणवीरला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. खुद्द रणवीरने याबाबत खुलासा केला आहे. ‘पद्मावती’ साईन करण्यासाठी मी बराच वेळ घेतला. कारण ही भूमिका माझ्यासाठी रिस्क होती. अनेकांनी मला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. एका सीनिअर अभिनेत्यानेही मला हा चित्रपट तुझ्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकतो, असेच सांगितले होते. अनेकदा लोकांना पडद्यावरील निगेटीव्ह भूमिका आवडत नाही. मग ही भूमिका जगणाºया कलाकाराचाही लोक द्वेष करू लागतात. मुख्य प्रवाहातील कुठल्याही कलाकाराच्या करिअरसाठी असा द्वेष धोकादायकचं म्हणता येईल. ‘पद्मावती’तील अलाऊद्दीन खिल्जीची निगेटीव्ह भूमिका साईन करण्याआधी मलाही हा धोका जाणवला होता. याचमुळे हा चित्रपट साईन करण्यासाठी मी बराच वेळ घेतला. माझ्यासाठी हा कठीण निर्णय होता. पण मला संजय लीला भन्साळींवर पूर्ण विश्वास होता आणि आहे. त्यांना मी कधीच नाही म्हणू शकत नाही. म्हणूनच मी ही रिस्क घेतली, असे रणवीरने सांगितले. भन्साळींनी मला हा सिनेमा आॅफर केला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्यासाठी मी कुठलीही भूमिका करायला तयार आहे, कुठलाही धोका पत्करायला तयार आहे, असेही रणवीरने सांगितले.ALSO READ: रणबीर कपूर नाही तर रणवीर सिंग उतरला मैदानात! माहिरा खानचा असा केला बचाव!!आता रणवीरचा भन्साळींवर इतका विश्वास का? यामागेही कारण आहे. खरे सांगायचे तर रणवीर आज इतक्या उंचीवर आहे, यामागे भन्साळींचा मोठा हात आहे. रणवीरकडे कुठलाही मोठा सिनेमा नव्हता, त्याकाळात भन्साळींनीच रणवीरवर विश्वास दाखवत ‘गोलियों की रामलीला- रासलीला’ त्याला आॅफर केला होता. यानंतर ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातही त्यांनी रणवीरला पसंती दिली. या दोन्ही चित्रपटांनी रणवीरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कदाचित भन्साळींच्या याच ऋणाची परतफेड रणवीर करत असावा.