Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खान नाही तर अक्षय कुमारसोबत होणार ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा डेब्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:00 IST

मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकला आणि तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा सुरु झाल्या. या काळात मानुषीने स्वत: अनेकदा आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. पण आमिरसोबत मानुषीचा डेब्यू जरा कठीण दिसतोय. कारण आता आमिर नाही तर अक्षय कुमारसोबत तिच्या डेब्यूची चर्चा रंगतेय.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी मेडिकलची विद्याथीर्नी आहे.

मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकला आणि तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा सुरु झाल्या. या काळात मानुषीने स्वत: अनेकदा आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. पण आमिरसोबत मानुषीचा डेब्यू जरा कठीण दिसतोय. कारण आता आमिर नाही तर अक्षय कुमारसोबत तिच्या डेब्यूची चर्चा रंगतेय. होय, सगळे काही जुळून आले तर मानुषी अक्षय कुमारच्या अपोझिट दिसू शकते.ताज्या चर्चेनुसार, पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये अक्षय व मानुषी एकत्र काम करताना दिसू शकतात. यशराज बॅनरचा हा चित्रपट मानुषीने साईन केल्याचेही कळतेय. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.

यशराज निर्मित हा चित्रपट चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानुषी यात संयुक्ताची भूमिका साकारताना दिसेल. यशराजचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा याने या चित्रपटासाठी मानुषीची निवड केल्याचेही कळतेय. मानुषीचा स्क्रिन प्रेजेंटेशन अफलातुन असल्याचे त्याचे मत आहे. तूर्तास मानुषी अ‍ॅक्टिंग आणि डान्स वर्कशॉपमध्ये बिझी आहे. पृथ्वीराज चौहानचे बायोपिक एक मोठी लव्हस्टोरी असणार आहे. साहजिकच अक्षय आणि मानुषीचा आॅनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी फराह खान मानुषीला लॉन्च करणार, अशी बातमी होती. त्यापूर्वी मानुषी रणवीर सिंगसोबत डेब्यू करणार, अशाही अफवा उडाल्या होत्या. आता मानुषी अक्षयसोबत डेब्यू करणार, असे सांगितले जातेय. सध्या तरी मानुषी याबद्दल काहीही बोलायला तयार नाही. कदाचित वेळ आल्यानंतर ती स्वत:च याबद्दलची घोषणा करेल. २०१७ मध्ये ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी मेडिकलची विद्याथीर्नी आहे.  मानुषीने मिस फोटोजेनिकचा अवार्डही आपल्या नावावर केला आहे. ती ‘मिस हरियाणा’ही राहिली आहे.

टॅग्स :मानुषी छिल्लर