Join us  

Fifa World Cup : लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचं स्वप्न; बॉलिवूड अभिनेत्री मानुषी कतारमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 5:53 PM

 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाचा आयकॉन लिओनेल मेस्सी याला खेळताना पाहण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कतारला गेली आहे! 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) तिच्या लाडक्या लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी काही दिवसांची सुट्टी घेऊन कतारला रवाना झाली आहे.  फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाचा आयकॉन लिओनेल मेस्सी याला खेळताना पाहण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कतारला गेली आहे! 

मानुषी म्हणाली की, “लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहणे हे माझे नेहमीच स्वप्न होते. त्याची निस्सीम चाहती असल्याने, फुटबॉल मैदानावरील त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेची झलक पाहण्यासाठी मी अनेक वर्षांपासून योजना आखत आहे. हा त्याचा शेवटचा फुटबॉल वर्ल्ड कप असू शकतो अशी बरीच चर्चा सुरू आहे.” 

मानुषीने मेस्सीमुळे अर्जेंटिनाला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये वर्ल्ड कप फुटबॉल सामना पाहण्याच्या उर्जेत भिजताना तिला खूप आनंद होणार आहे. ती म्हणते, “अर्जेंटिना सध्या बाद फेरीच्या टप्प्यात आहे.  त्याला नेदरलँड्सविरुद्ध खेळताना पाहणे मला चुकवायचे नाही, तो एक मजबूत संघ आहे! हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे आणि मला माहित आहे की त्याला खेळताना पाहून मला आनंद होईल.”

ती पुढे म्हणाली, “मी खरोखरच स्टेडियमचे वातावरण आणि उत्साह पाहण्यासाठी आणि मॅचद्वारे मेस्सीचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे! सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाचा वर्ल्ड कप दूरदर्शनवर पाहण्याऐवजी प्रत्यक्ष फायनल पाहण्यास मी उत्सुक आहे.”  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२मानुषी छिल्लरलिओनेल मेस्सीअर्जेंटिना