Join us

मनोज वाजपेयीसमोर नतमस्तक झाला हा प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता, वाचा या मागचा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 19:20 IST

मनोज वाजपेयीची द फॅमिली मॅन ही वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात मनोज वाजपेयीने साकारलेल्या भूमिकेचं सध्या खूप कौतुक होताना दिसतोय.

मनोज वाजपेयीची द फॅमिली मॅन ही वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात मनोज वाजपेयीने साकारलेल्या भूमिकेचं सध्या खूप कौतुक होताना दिसतोय. गेल्या गुरुवारी मनोज वाजपेयीचे जबरदस्त अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले.  

मनोज वाजपेयी शिवाय या कार्यक्रमाला गँग ऑफ वासेपुर मधील तिगमांशु धुलिया आणि पीयुष मिश्रापण उपस्थित होते. तसेच कॉमेडीय अभिनेता सुनील ग्रोवरसुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होता. आजतकच्या रिपोर्टनुसार, मनोज वाजपेयीने आपल्या शानदार भाषणंने उपस्थितांची वाहवाह मिळवली. मात्र सुनील ग्रोवरने जे काही केलं त्यांने सगळ्यांची मनं जिंकली. सुनील ग्रोवरने मनोज वाजपेयीचा सन्मान करताना त्याला नारळ भेट देत त्याच्या समोर गुडघ्यांवर बसून नतमस्तक झाला. हे बघून मनोज वाजपेयीसुद्धा हैराण झाला. त्याने सुनील ग्रोवरला मीठी मारली. हा क्षण बघून उपस्थित सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट झाला.  

 कृष्‍णा डी. के. आणि राज निदीमोरू यांची निर्मिती असलेली द फॅमिली मॅन ही दहा एपिसोड्सची सीरिज आहे. द फॅमिली मॅन ही रोमांचक ड्रामा-थ्रिलर सीरिज आहे. ही सीरिज एका मध्‍यमवर्गीय माणसाची कथा सादर करते.

मनोज वाजपेयीबाबत बोलायचे झाले तर १९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  

टॅग्स :मनोज वाजपेयी