Join us

मनोज वाजपेयींना आवडतो अमृता सुभाषचा 'हा' मराठी सिनेमा, स्टेजवरच केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:51 IST

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अमृता सुभाषला मनोज वाजपेयींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक. काही वेळातच ते प्रेक्षकांना आपलंसं करुन घेतात. एखादी गंभीर भूमिका असो किंवा गँग्स ऑफ वासेपूरसारखी हटके भूमिका असो ते सगळ्या रोलमध्ये फिट बसतात. फक्त हिंदीतच नाही तर मराठी प्रेक्षक, कलाकारही त्यांचे चाहते आहेत. अशा प्रतिभावान अभिनेत्याने मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचं (Amruta Subhash) कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमृताचा एक मराठी सिनेमाही त्यांच्या आवडीचा आहे असं ते म्हणालेत.

नुकत्याच पार पडलेल्या 'झी 5' पुरस्कार सोहळ्यात अमृता सुभाषला मनोज वाजपेयींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. 'सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड' या सिरीजमधील तिच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. यावेळी मनोज वाजपेयी यांनी अमृताचं तोंडभरुन कौतुक केलं. ते म्हणाले, "अमृता अतिशय उत्कृष्ट  अभिनेत्री आहे. जेव्हा मी तिचा किल्ला हा सिनेमा पाहिला तेव्हाच मी म्हणलं की यार काय अभिनेत्री आहे की. मला तिचं काम खूपच आवडलं. अभिनयाप्रती तिचं असलेलं प्रेम, जिद्द कौतुकास्पद आहे. हा पुरस्कार देण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे."

अमृताने स्टेजवरील हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, "धन्यवाद. ज्या अभिनेत्याचं काम पाहून तुम्ही प्रभावित होता तो तुमचं जेव्हा कौतुक करतो तेव्हा खूप आनंद होतो.  मनोज वाजपेयीचं प्रत्येक काम एक पाठशाळा वाटते. त्यांचं हे बोलणं म्हणूनच अनमोल आहे. सासबहुआचारप्रायवेटलिमिटेडसाठी मिळालेला हा हा पुरस्कार ही त्यासाठी अनमोल आहे.कृतज्ञ."

टॅग्स :मनोज वाजपेयीमराठी अभिनेता