Join us

'शाहरुख सलमानएवढं मानधन मला मिळत नाही', 'द फॅमिली मॅन' फेम मनोज वाजपेयींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 10:51 IST

गल्लीबोळातल्या फिल्म करुन कोणी श्रीमंत होत नाही.

अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेते. फक्त मोठा पडदाच नाही तर त्यांनी ओटीटीवर 'द फॅमिली मॅन' (The Family Man) सारख्या सिरीजमधून पदार्पण केलं. पहिल्याच सिरीजमधून मनोज वाजपेयींनी प्रेक्षकांचं मन जिंकलं.  फॅमिली मॅनसाठी खूप कमी फीस मिळाल्याचा खुलासा त्यांनी नुकताच एका मुलाखतीत केला.

शाहरुख सलमानला मिळतं तेवढं मानधन मला मिळत नाही

मनोज वाजपेयींनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बँक बॅलन्सविषयी सांगितले. गल्लीबोळातल्या फिल्म करुन कोणी श्रीमंत होत नाही. 'द फॅमिली मॅन 'विषयी मनोज वाजपेयी म्हणाले,'मला आजपर्यंत पूर्ण पेमेंट मिळालेलं नाही.ओटीटीवाले इतर निर्मात्यांपेक्षा कमी नाही. हे सुद्धा फक्त मोठ्या स्टार्सला पैसे देतात, मला जास्त पैसे मिळत नाहीत जितके फॅमिली मॅनसाठी मिळायला हवे होते.'

ते पुढे म्हणाले,'कोणी गोरा(हॉलिवूड कलाकार)आला, त्याने शो केला तर त्याला पैसे देतील. मोठमोठ्या ब्रँड्सची चीनमध्ये फॅक्ट्री आहे कारण तिकडे मजुरी स्वस्त आहे. आम्ही यांच्यासाठी असेच स्वस्त मजूर आहेत.'

फॅमिली मॅन जेव्हा साईन केला तेव्हा पत्नी शबानाला ते अजिबात मान्य नव्हतं. तिला वाटलं कुठे फिल्म सोडून सीरिअल करणार. इतकी काय गरज आहे पैशांची? करिअर नको बर्बाद करु. हे ओटीटी काय आहे याची तिलाही कल्पना नव्हती. तेव्हा मी तिला ओटीटीचं महत्व समजावून सांगितलं.

टॅग्स :मनोज वाजपेयीसलमान खानशाहरुख खानवेबसीरिज