Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फॅमिली मॅन'नंतर मनोज वाजपेयी बनले 'गव्हर्नर'; देशाला आर्थिक संकटातून वाचवण्याची कहाणी, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:39 IST

'फॅमिली मॅन' म्हणून गाजल्यानंतर मनोज आता 'गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर' या चित्रपटातून आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Manoj Bajpayee New Movie : अभिनेते मनोज वाजपेयी बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकारापैंकी एक आहेत. मनोज वाजपेयींनं त्यांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय ओटीटीवरही त्यांचा बोलबाला आहे. आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारे मनोज वाजपेयी आता एका भव्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतत आहेत. ओटीटीवर 'फॅमिली मॅन' म्हणून गाजल्यानंतर मनोज आता 'गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर' या चित्रपटातून आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मनोज वाजपेयींच्या आगामी 'गव्हर्नर : द सायलेंट सेव्हिअर' चित्रपटाचे काही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यात मनोज हे एका वेगळ्याच रूपात दिसत आहेत. सूट, बूट आणि चष्म्यामध्ये त्यांचा 'गव्हर्नर'चा लूक अतिशय प्रभावी वाटतोय. एका पोस्टरमध्ये ते कारमध्ये गंभीर मुद्रेत बसलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ते एक सिद्धांत सोडवताना पाहायला मिळत आहेत.

 'गव्हर्नर : द सायलेंट सेव्हिअर' हा चित्रपट एका राष्ट्रीय संकटावर आधारित एक राजकीय थ्रिलर आहे. याची कथा सुवेंदू भट्टाचार्जी, सौरभ भरत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी सह-लेखन केली आहे. जावेद अख्तर यांनी गीत लिहिले असून, अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे.

'गव्हर्नर : द सायलेंट सेव्हिअर' कधी प्रदर्शित होणार?

येत्या १२ जून २०२६ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये 'गव्हर्नर : द सायलेंट सेव्हिअर' प्रदर्शित होणार आहे. मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरचं दिग्दर्शन असलेल्या 'गव्हर्नर : द सायलेंट सेव्हिअर' सिनेमात मनोज यांच्यासोबत अदा शर्मा, मधू शाह, अभिनेता पारितोष, जयवंत वाडकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. याआधी चिन्मय मांडलेकर आणि मनोज वाजपेयींनी 'इन्स्पेक्टर झेंडे' या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं होतं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Bajpayee becomes 'Governor' after 'Family Man'; movie release date?

Web Summary : Manoj Bajpayee stars in 'Governor: The Silent Savior,' a political thriller about saving India from an economic crisis. Directed by Chinmay Mandlekar, the film releases on June 12, 2026, featuring Adah Sharma and Madhoo Shah.
टॅग्स :मनोज वाजपेयी