Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोज वाजपेयी बनला मराठी शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 00:37 IST

बॉलिवुडचा सत्या चित्रपट आठवतो का? येस याच चित्रपटातील भिकू म्हात्रेचा अभिनय केलेला मनोज वाजपेयी हा अभिनेत्याची चर्चा हयाच चित्रपटापासून ...

बॉलिवुडचा सत्या चित्रपट आठवतो का? येस याच चित्रपटातील भिकू म्हात्रेचा अभिनय केलेला मनोज वाजपेयी हा अभिनेत्याची चर्चा हयाच चित्रपटापासून बॉलिवुडमध्ये सुरू झाली. यानंतर मनोजने झुबेदा, वीर-झारा, राजनिती, गॅग आॅफ वासेपुर भाग १ असे एकचे एक चित्रपट बॉलीवुडला दिले आहे.  आता, हाच अभिनेता थेट मराठी शिक्षकाच्या भूमिकेत अलिगढ या बॉलिवुड चित्रपटात दिसणार आहे. लेखक श्रीनिवास सिरस उत्तरप्रदेशमधील एका विदयापीठात मराठीचे शिक्षक असतात. परंतु जेव्हा विदयापीठाला ते समलैगिंक असल्याचे कळते त्यावेळी त्यांना नोकरीवरून निलंबन करण्यात येते. अशा प्रकारची सत्यघटनेवर आधारित अशी या चित्रपटाची कहानी आहे. हंसल मेहता दिग्दर्शित अलिगढ या बॉलिवुड चित्रपटात श्रीनिवास सिरस या मराठी शिक्षकाची भूमिका मनोज वाजपेयी साकारत आहे. यासाठी त्याने मराठी भाषा शिकण्यासाठी काही मराठी प्राध्यापकांचा आधारदेखील घेतल्याच कळते. याव्यतिरिक्त या चित्रपटात राजकुमार राव, आशिष विदयार्थीदेखील झळकणार आहेत.