बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा प्रसिद्ध बंगला मन्नतच्या नुतनीकरणाचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे अभिनेता आपल्या कुटुंबासोबत मन्नतच्या अर्ध्या आकाराच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. पापाराझींनी शाहरुख खानला त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत त्याच्या नवीन घरात जाताना पाहिले. अभिनेत्याचे प्रसिद्ध घर 'मन्नत'चे नूतनीकरण करण्यात येत आहे आणि ते दोन वर्षांत तयार होईल. शाहरुखने भाड्याने घेतलेले नवीन घर रकुल प्रीत सिंगचे पती जॅकी भगनानीचे आहे.
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचे घर 'मन्नत' हे मुंबईतील एक प्रमुख आकर्षण आहे. शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब, पत्नी गौरी खान आणि मुले सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम हे तात्पुरते मुंबईतील पाली हिल येथील नवीन अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहायला गेले आहेत. कारण त्यांच्या मन्नत घराचे नुतनीकरण करण्याचे काम सुरू आहे.
नवीन घराचे इतके आहे रेंटशाहरुख खानला त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि मुलगी सुहाना खानसह त्याच्या नवीन घरात राहायला जाताना पापाराझींनी पाहिले. मुंबईतील बँडस्टँड येथील त्याच्या बंगल्याचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण सुरू असल्याने शाहरुख सुमारे दोन वर्षे नवीन घरात राहणार आहे. शाहरुख खानच्या या नवीन अपार्टमेंटचे भाडे दरमहा २४ लाख रुपये असेल. झॅप्कीच्या मते, शाहरुख खानने दरवर्षी २.९ कोटी रुपयांना दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. चार मजल्यांसाठी हे भाडे दरमहा २४ लाख रुपये आहे. शाहरुखने भगनानी कुटुंबाकडून फ्लॅट भाड्याने घेतले आहेत.
अभिनेत्याचे सुरक्षा रक्षकही राहणार अपार्टमेंटमध्ये'मन्नत'च्या तुलनेत नवीन घर आकाराने लहान असूनही, या अपार्टमेंटमध्ये शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचे सुरक्षारक्षक आणि कर्मचारी देखील राहतील. एका सूत्राने वेबसाइटला सांगितले की, "ते निश्चितच मन्नतइतके मोठे नाही, परंतु त्यात त्याच्या सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी जागा आहे."
शाहरुख खानचा कोण आहेत नवीन शेजारी?शाहरुख खानचे नवीन शेजारी कोण असेल, असाही एक प्रश्न आहे. शाहरुखने भगनानी कुटुंबाकडून अपार्टमेंट भाड्याने घेतले असल्याने, ते त्याचे शेजारी देखील असतील कारण ते संपूर्ण इमारतीचे मालक आहेत आणि तिथेच राहतात. जॅकी भगनानी, त्याची पत्नी रकुल प्रीत सिंग, वाशू भगनानी आणि पूजा भगनानी एकाच इमारतीत राहतात आणि ते खानचे शेजारी असतील.