Join us

मनिषा म्हणते, नर्गिस मोठ्या पडद्यावर साकारणे हे माझे भाग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 11:35 IST

अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या राजू हिरानीच्या मोस्ट अवेटेड संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात नर्गिस यांची भूमिका साकारण्याच्या तयारीत व्यस्त ...

अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या राजू हिरानीच्या मोस्ट अवेटेड संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात नर्गिस यांची भूमिका साकारण्याच्या तयारीत व्यस्त आहे. नर्गिस यांच्या भूमिकेला घेऊन मनिषा चांगलीच चर्चेत आहे. नर्गिस यांची भूमिका मला साकारायला मिळते आहे हे माझ भाग्य असल्याचे तिचे म्हणणे आहे. या भूमिकेसाठी माझी निवड होण्यापूर्वीपासून मी भूमिकेच्या तयारीला लागले होते. मी अनेक लूक ट्रायदेखील केले. मी माझ्या केसांसोबत अनेक प्रयोग केले. कधी केस मोठे ठेवून बघितले तर कधी केस लहान ठेवून बघितले. नर्गिस यांच्या भूमिकेत मी कशी फिट बसेन यासाठी  मी स्वत:बरोबर अनेक प्रयोग केले.  अजूनपर्यंत मनिषाच्या भूमिकेची शूटिंग सुरु झालेले नाही. पण ही भूमिका साकारण्यासाठी मी मात्र पूर्णपणे तयार असल्याचे तिचे म्हणणे आहे. मला पडद्यावर नर्सिग यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल असे देखील ती म्हणाली. लवकरच या चित्रपटाच्या टीम बरोबर मनिषाची मीटिंग आहे. सध्या मनिषा नर्गिस यांचे जुने व्हिडीओ आणि चित्रपट पाहते आहे. या व्हिडीओमधून ती त्यांची बॉडी लैंग्वेज, चालणे आणि बोलण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करते आहे. या बायोपिकमध्ये मनिषाच्या मुलाची अर्थात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतो आहे. रणबीर या चित्रपटाचे जवळपास 14 तास शूटिंग करतो आहे. याचित्रपटासाठी रणबीर लूक आणि बॉडी दोन्ही गोष्टींवर प्रचंड मेहनत घेतली आहे. रणबीरच्या लूकचे खुद्द संजय दत्तने ही कौतुक केले