मनीषा कोईराला होणार आई!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 17:09 IST
मनीषा कोईराला आई होणार आहे..होय, पण रिल लाईफमध्ये हं!! ही गुणी अभिनेत्री बºयाच दिवसांपासून एका सशक्त भूमिकेच्या प्रतीक्षेत होती. ...
मनीषा कोईराला होणार आई!!
मनीषा कोईराला आई होणार आहे..होय, पण रिल लाईफमध्ये हं!! ही गुणी अभिनेत्री बºयाच दिवसांपासून एका सशक्त भूमिकेच्या प्रतीक्षेत होती. यादरम्यान काही भूमिका मनीषाकडे चालून आल्याही. पण त्या तिला रूचल्या नाही. पण अखेर मनीषाला तिच्या मनासारखी भूमिका मिळाली आहे. एका हिंदी-बंगाली चित्रपटात मनीषा आईची भूमिका साकारणार आहे. होय, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि प्रकाश झा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक राहिलेला प्रोमित सेनगुप्ता दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. प्रोमितच्या चित्रपटात मनिषा आईची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट म्हणजे २० वर्षांनंतर एकत्र येणाºया आई आणि मुलाची कथा आहे. हा एक महिलाप्रधान चित्रपट आहे. साहजिक मनीषाची भूमिका यात सशक्त असणार आहे. त्यामुळेच मनीषाला यात पाहणेही इंटरेस्टिंग असणार आहे...होय ना!!