तारकांनी उजळली मनीषची पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 09:26 IST
बॉलिवूडमधील अनेक तारकांसाठी त्यांनी स्पेशल पार्टी आयोजित केले होती
तारकांनी उजळली मनीषची पार्टी
बॉलिवूड कॉस्च्युम डिझायनर मनीष मल्होत्रा आकर्षक डिझाईन्सबरोबरच त्याच्या ‘सेलिबे्रटी फ्रेंड्स सर्कल’साठीदेखील प्रसिद्ध आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा कालच्या पार्टीमध्ये आली.बॉलिवूडमधील अनेक तारकांसाठी त्यांनी स्पेशल पार्टी आयोजित केले होती. त्यामध्ये करिश्मा कपूर, मलाईका आरोरा, अमृता आरोरा, प्रीती झिंटा, नेहा धुपिया, नीतू कपूर, सोफी चौधरी, एकता कपूर, रीमा जैन यांसारख्या लावण्यवतींनी या पार्टीला चार चांद लावले.इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पार्टीमधील ग्रुप फोटो आणि सेल्फीवरून तर असे दिसतेय की, संपूर्ण पार्टीमध्ये या ‘गर्ली गँग’ खूप मजा-मस्ती केलेली आहे. अशा धमाल पार्टीला मात्र ‘बेबो’ गैरहजरी होती. तिला पार्टीचे आमंत्रणसुद्धा होते. तिची अनुपस्थितीमुळे काही शंका उपस्थित झाल्या.पण नंतर सांगण्यात येत आले की, कामात व्यस्त असल्यामुळे ती पार्टीला वेळ नाही देऊ शकत. असो. एवढे मात्र खरे आहे की, या सर्व करिनाने एक जबरदस्त पार्टी मिस केली आहे.