Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मुलाचा ‘धांसू’ डान्स पाहून व्हाल खल्लास, रेमोपासून हृतिक रोशनपर्यंत सगळेच पडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 14:42 IST

रेमो पासून हृतिकला वेड लावणा-या या मुलाचे नाव युवराज सिंग आहे.

ठळक मुद्देयुवराजचा व्हिडीओ महानायक अमिताभ यांनीही शेअर केला होता.

सोशल मीडियामुळे एका रात्रीत फेमस झालेले अनेक आहेत. सर्वात ताजे उदाहरण घ्यायचे तर रानू मंडलचे घेता येईल. रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन भीक मागणा-या रानूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या एका व्हायरल व्हिडीओने तिचे नशीब बदलले. हिमेश रेशमियासारख्या दिग्गज संगीतकाराने रानू मंडलला बॉलिवूडमध्ये संधी दिली. कदाचित येत्या काळात याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. होय, एका मुलाचा टिक टॉक व्हिडीओ पाहून कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजा, हृतिक रोशन असे सगळे त्याच्या प्रेमात पडले आहेत. होय, रेमोपासून हृतिकपर्यंत सगळेच या मुलाचा पत्ता शोधत आहेत.ट्विटरवर या मुलाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत हा मुलगा रेमोचा आगामी सिनेमा ‘स्ट्रिट डान्सर 3डी’च्या ‘मुकाबला’ या गाण्यावर नाचतोय. त्याचा डान्स इतका ‘धांसू’ आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हाला मायकल जॅक्सन नक्की आठवेल.या मुलाच्या डान्स मुव्ह्ज इतक्या जबरदस्त आहेत की, खुद्द हृतिकने त्याचे कौतुक केले आहे.

 

हा व्हिडीओ शेअर करत, हृतिकने या मुलाची विचारणा केली आहे. ‘इतका उत्तम एअरवॉकर मी आजपर्यंत पाहिलेला नाही. हा कोण आहे?’ असे हृतिकने लिहिले आहे.

‘आर्टिकल 15’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही हा व्हिडीओ शेअर करत त्यात रेमो डिसूजाला टॅग केले. यानंतर रेमोनेही हा व्हिडीओ शेअर केला.

रेमो पासून हृतिकला वेड लावणा-या या मुलाचे नाव युवराज सिंग आहे. तो @Babajackson2020 या नावाच्या आपल्या अकाऊंटवरून अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. युवराजचा व्हिडीओ महानायक अमिताभ यांनीही शेअर केला होता. यापूर्वी रवीना टंडन, सुनील शेट्टी, अर्शद वारसी आदींनही त्याचा व्हिडीओ शेअर केला होता.

टॅग्स :हृतिक रोशनरेमो डिसुझाटिक-टॉक