Join us

गर्दीत एका व्यक्तीनं मौनी रॉयसोबत केलं असं काही ज्यामुळे उडाला तिचा थरकाप, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 12:03 IST

मौनी रॉयला नुकतेच चाहत्यांनी घेरले होते. यादरम्यान तिच्यासोबत एका व्यक्तीने गैरवर्तणूक केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. ती जेव्हा केव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते गर्दी करतात. नुकतेच मौनी रॉय जेव्हा कामासाठी बाहेर पडली होती तेव्हा तिला चाहत्यांनी घेरले. मात्र यादरम्यान एका व्यक्तीने तिच्यासोबत अशी वर्तणूक केली जी पाहून तिची घाबरगुंडी उडाली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मौनी रॉयच्या भोवती गर्दी केली. यादरम्यान एक हुडी घातलेला व्यक्ती फोटो काढण्यासाठी मौनीच्या हातावर हात मारतो. हे पाहून मौनी घाबरली आणि म्हणाली अरे. या घडलेल्या प्रकारामुळे मौनी चांगलीच घाबरलेली दिसते आहे. तरीदेखील तिने काही चाहत्यांसोबत सेल्फी काढली आणि तिथून निघून गेली.

मौनी रॉयच्या चाहत्याची ही वर्तणूक पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, प्लीज तीदेखील माणूस आहे त्यांचा आदर करा. तर दुसऱ्याने म्हटले की, कसे चाहते आहेत, हे लोक फोटो काढण्यासाठी आत घुसतात. तर आणखी एका युजरने लिहिले की , हे लोक असे वागतात जसे की त्यांनी या सेलिब्रेटींना विकत घेतले आहे.

आगामी प्रोजेक्ट्समौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर मौनी रॉयने वेल्ले चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अभय देओल आणि करण देओलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती ब्रह्मास्त्रमध्येही झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही.

टॅग्स :मौनी राॅय