Join us  

मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 4:14 PM

Deepika Padukone : अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमारनंतर आता रोहित शेट्टीच्या फेमस कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पादुकोणने एन्ट्री केली आहे.

अजय देवगण (Ajay Devgn), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अक्षय कुमार(Akshay Kumar)नंतर आता रोहित शेट्टी(Rohit Shetty)च्या फेमस कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने एन्ट्री केली आहे. दिग्दर्शक रोहितच्या 'सिंघम अगेन' या नव्या चित्रपटात दीपिका एका पोलिस महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदाच आपल्या चित्रपटात पोलीस स्त्री दाखवणार आहे. ही बातमी समोर येताच दीपिका पादुकोण आणि सिंघम चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'सिंघम अगेन' या चित्रपटातून अजय देवगण पुन्हा एकदा पडद्यावर आपल्या प्रसिद्ध बाजीराव सिंघमची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा अजय आणि दीपिका एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दीपिका पादुकोणला लेडी सिंघमच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दीपिका बनणार लेडी सिंघम२०११ मध्ये अजय देवगणने 'सिंघम' या चित्रपटाद्वारे कॉप युनिव्हर्सची सुरुवात केली. यामध्ये अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका साकारली आणि तो देशभर लोकप्रिय झाला. २०१४ साली 'सिंघम रिटर्न्स' हा चित्रपट आला होता. यामध्ये अजयसोबत करीना कपूर खान दिसली होती. मात्र, या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

दीपिका पादुकोणच्या आधी तिचा पती रणवीर सिंग देखील रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग बनला आहे. 'सिम्बा' चित्रपटात रणवीरने जबरदस्त काम दाखवले होते. त्यांनी पोलिस संग्राम भालेराव यांची भूमिका केली होती. त्यांची ही फनी स्टाइल खूप आवडली होती. रणवीर आणि अजयशिवाय रोहित शेट्टीने अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' हा चित्रपट बनवला आहे.

सीरिजमध्ये दिसणार शिल्पा शेट्टी'सिंघम अगेन' व्यतिरिक्त, रोहित शेट्टी त्याच्या कॉप युनिव्हर्ससह ओटीटीवर देखील जात आहे. काही काळापूर्वी त्याने आपल्या 'इंडियन पुलीस फोर्स' या मालिकेची घोषणाही केली होती. या मालिकेत शिल्पा शेट्टी एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय देखील असतील. ही मालिका Amazon Prime वर रिलीज होणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगरोहित शेट्टीअजय देवगणअक्षय कुमार