Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मल्लिकाचे सीक्रेट वेडिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 16:11 IST

‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत अखेर लग्नगाठीत अडकलीच. प्रियकर साइरिल आॅक्जेनफेन्ससोबत पॅरिसमध्ये तिने लग्न केले. दोन दिवसांपूर्वी हा विवाह सोहळा ...

‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत अखेर लग्नगाठीत अडकलीच. प्रियकर साइरिल आॅक्जेनफेन्ससोबत पॅरिसमध्ये तिने लग्न केले. दोन दिवसांपूर्वी हा विवाह सोहळा झाला आणि त्याबद्दल अतिशय गोपनीयता पाळली गेली. मात्र मल्लिकाचे पिता मुकेश लांबा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच भारतात मल्लिका व साइरिल यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा होणार आहे, असे  त्यांनी सांगितले. तथापि या लग्नाची छायाचित्रे अद्याप समोर आलेली नाहीत.मल्लिका सध्या पॅरिसलाच आहे. यादरम्यान येत्या ११ ते २२ मेदरम्यान होणाºया कान फिल्म फेस्टिवलमध्ये ती भाग घेणार आहे. याठिकाणी ती ‘दी लास्ट टॉम्ब’ या आपल्या हॉलिवूडपटाचे प्रमोशन करेल.साइरिल हा पॅरिसचा एक रिअल इस्टेट बिझनसमॅन आहे. बºयाच दिवसांपासून मल्लिका-साइरिलसोबत डेट करीत होती. साइरिलसोबचा एक फोटोही मल्लिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. गत ‘व्हॅलेन्टाईन डे’ला साइरिलने मल्लिकाला एक महागडी लक्झरी कार भेट दिली होती, अशीही चर्चा होती. गत मे महिन्यात मल्लिका साइरिलसोबत मुंबई विमानतळावरही दिसली होती.