Join us

मल्लिका शेरावत वयाच्या 45 व्या वर्षीही आहे खूपच फिट, बिकनी घालून फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:37 IST

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika sherawat) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika sherawat) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. इथेही ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मल्लिका लॉस एंजेलिस, यूएसए येथे शिफ्ट झाली आहे आणि मुंबईत येत जात असते.  तिने तिच्या घराचे सुंदर फोटो अनेकवेळा चाहत्यांना दाखवले आहेत. यावेळी मल्लिकाने गोव्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती स्विमिंग पूलजवळ रिलॅक्स मूडमध्ये आहे आणि चहाचा आनंद घेत आहे.

मल्लिकाने प्रिंटेड बिकनी घातली आहे. ती पूलच्या बाजूला उभी आहे आणि तिची फिगर फ्लॉंट करत आहे. ४५ वर्षीय मल्लिकाला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'जास्मिन ग्रीन टीचा आनंद घेत आहे.'

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर मल्लिका शेरावत अखेरची २०१९ मध्ये आलेली सीरिज 'बू सबकी फटेगी' मध्ये दिसली होती. ही एक हॉरर-कॉमेडी होती. याचं दिग्दर्शन फरहाद सामजीने केलं होतं. रिपोर्टनुसार, मल्लिका लवकरच साऊथ सिने इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. ती 'नागमति' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज होणार आहे.

मल्लिका शेरावतने २००३ साली आलेल्या 'ख्वाहिश' सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. पहिल्या सिनेमात मल्लिकाने १७ किसिंग सीन्स दिल्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र, 'मर्डर' सिनेमातून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली. सिनेमाची गाणी चांगलीच हिट तर ठरलीच, पण इम्रानसोबतच्या मल्लिकाची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

टॅग्स :मल्लिका शेरावतबॉलिवूड