मल्लिकाचे हे सर्व काही ऐकून तिच्या शेजारी बसलेल्या सोहेल खानला मात्र हसू आवरता आले नाही. अर्थात मल्लिका हे सर्व काही चेष्टामस्करीत शोमध्ये बोलत होती. दरम्यान, मल्लिका गेल्या काही वर्षांपासून बॉयफ्रेंड सायरिल आॅक्सनफॅन्स याच्यासोबत पॅरिस येथे राहात आहे. काही दिवसांपूर्वीच बातम्या समोर आल्या होत्या की, मल्लिकाला तिच्या बॉयफ्रेंडसह फ्लॅटमधून बाहेर काढण्यात आले. या फ्लॅटचे भाडे ते भरू शकत नसल्यामुळेच त्यांना घराबाहेर काढण्यात आले. मात्र मल्लिकाने या बातम्या निराधार असल्याचे म्हटले.}}}} ">Watch @mallikasherawat and @SohailKhan enjoy their weekend with our #EntertainmentKeGuru on #EntertainmentKiRaat tonight at 10 PM. @tweetfromRaghu@BalrajSyal@mymalishkapic.twitter.com/2eMUVJEbow— COLORS (@ColorsTV) January 6, 2018
मल्लिका शेरावतने बराक ओबामा यांना हरियाणात येण्यासाठी दिले निमंत्रण, वाचा नेमके काय आहे प्रकरण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 19:33 IST
मल्लिका शेरावत हिने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना हरियाणात येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. वाचा सविस्तर!
मल्लिका शेरावतने बराक ओबामा यांना हरियाणात येण्यासाठी दिले निमंत्रण, वाचा नेमके काय आहे प्रकरण!
अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमधून गायब आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विदेशात राहात होती, आता ती मुंबईत आली असून, नुकतीच एक शोमध्ये बघावयास मिळाली. या शोमध्ये तिने चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याबद्दल वक्तव्य केले. तिने म्हटले की, मी केवळ अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना भारतात येण्याचे निमंत्रणच दिले नाही तर, हरियाणात येऊन खाटेवर बसून ऊन शेकण्याची आॅफरही दिली. होय, हा खुलासा स्वत: मल्लिकानेच केला आहे. कलर्स चॅनलवरील ‘एंटरटेन्मेंट की रात’ या शोच्या आजच्या एपिसोडमध्ये मल्लिका आणि सलमान खानचा भाऊ सोहेल खान बघावयास मिळणार आहे. यावेळी मल्लिकाला, ‘तू विदेशात जाऊन तेथील लोकांना भारतीय कपडे परिधान करण्यास शिकविले काय?’ असे विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, मी तर प्रेसिडेंट ओबामा यांच्याशी याविषयी बोलली. मी त्यांना सांगितले की, ‘एकदा तरी आमच्या हरियाणात या... शुद्ध देसी तुपाचे लड्डू, देसी तुपाची मिठाई... देसी तुपाची जिलेबी... हे सर्व काही तुम्हाला खाऊ घालणार. तसेच तुमचे पाय चेपून देणार... तुमची सेवाही करणार... तुम्ही फक्त खाटेवर बसून उन्हाचा आनंद घ्या.’