Join us

मी आजही ऑडिशन देते, ते नाही...! मल्लिका शेरावत स्टारकिड्सवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 10:25 IST

Mallika Sherawat : कधीकाळी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत अचानक चर्चेत आलीये. कारण काय तर स्टारकिड्सवरचा तिचा संताप,

ठळक मुद्देमल्लिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांत काम केले आहे. तिच्या Rk/RKay या सिनेमाबद्दल सांगायचे तर हा सिनेमा रजत कपूरने दिग्दर्शित केला आहे.

कधीकाळी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) अचानक चर्चेत आलीये. कारण काय तर स्टारकिड्सवरचा तिचा संताप. होय, एका ताज्या मुलाखतीत मल्लिका स्टारकिड्सवर भलतीच संतापली. मी प्रत्येक सिनेमासाठी ऑडिशन दिले आहे. स्टारकिड्सला ऑडिशनमधून जावे लागते की नाही मला माहित नाही, असे मल्लिकाने म्हटले आहे.टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका बोलली. मल्लिकाचा Rk/RKay हा सिनेमा गेल्या आठवड्यात अमेरिकेत रिलीज झाला. या पार्श्वभूमीवर ती बोलली.

प्रत्येक सिनेमासाठी ऑडिशन...मी माझ्या करिअरमध्ये प्रत्येक सिनेमासाठी ऑडिशन दिलेय. ऑडिशनशिवाय एकही सिनेमा मला मिळालेला नाही. जॅकी चॅनने सुद्धा अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतल्यानंतर मला त्याच्या सिनेमात कास्ट केले होते. ही प्रक्रिया नेहमीसाठी होती. स्टारकिड्सला या प्रक्रियेतून जावे लागते की नाही, हे मात्र मला माहित नाही. अलीकडे त्यांच्यासाठी ही प्रक्रिया फॉलो होते की नाही, ठाऊक नाही. रजत कपूरने Rk/RKay या सिनेमासाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हाही मला लुक टेस्ट आणि स्क्रिन टेस्ट द्यावी लागली होती. या टेस्टमध्ये फेल झालीस, तर तुला भूमिका मिळणार नाही, हे रजतने मला आधीच स्पष्ट सांगितले होते़, असे मल्लिका म्हणाली.मल्लिका आताश: बॉलिवूडमधून जवळपास बाद झाली आहे. मात्र अधूनमधून आपल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत येते. सोशल मीडियावरच्या ग्लॅमरस व बोल्ड फोटोंमुळेही तिची चर्चा होते.

मल्लिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांत काम केले आहे. तिच्या Rk/RKay या सिनेमाबद्दल सांगायचे तर हा सिनेमा रजत कपूरने दिग्दर्शित केला आहे. गेल्या 14 मे रोजी हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात मल्लिकाने गुलाबोची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मल्लिका शेरावत