Join us

पॅरीसमध्ये 'मल्लिका'-ए-हुस्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:36 IST

  अभिनेत्री मल्लिका शेरावत जे काही करते त्याची चर्चा तर होतेच. मग ते तिच्या मादक अदा असो किंवा ...

 
 
अभिनेत्री मल्लिका शेरावत जे काही करते त्याची चर्चा तर होतेच. मग ते तिच्या मादक अदा असो किंवा मग सिनेमातील एखादा सीन. रिलसोबतच मल्लिकाच्या रिअल लाइफच्याही मल्लिकाच्या खुमासदार चर्चा ऐकायला मिळतात. बॉलीवुडपाठोपाठ हॉलीवुडमध्येही मल्लिकानं रसिकांच्या मनात स्थान मिळवलंय. त्यामुळं परदेशातही तिचा जलवा पाहायला मिळतो. सध्या मल्लिका पॅरिसमध्ये आहे. 
पॅरिसच्या रस्त्यावर मल्लिकाची जादू पाहायला मिळतेय. खुद्द मल्लिकानं ट्विट करुन फोटो शेअर केलेत.
 
आपल्या अदांनी मल्लिकानं पॅरिसमधील पत्रकार आणि फोटोग्राफर्सवरही मोहिनी घातलीय.. एका फोटोत एक पत्रकार पॅरिसच्या रस्त्यावर मल्लिकाची प्रतिक्रिया घेताना पाहायला मिळतोय.
 
दुस-या एका फोटोमध्ये एक फोटोग्राफर मल्लिकाच्या सौदर्यावर फिदा झाला आहे. त्यामुळं मल्लिकाची ती छबी कॅमे-यात टिपण्याचा तो प्रयत्न करतोय.
पॅरिसमध्ये मल्लिका बिझनेसमॅन साइरिय आँक्सेनफेसला डेट करत असल्याच्याही जोरदार चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी मल्लिकानं साइरिलसोबतचा पॅरिसमधील फोटो शेअर केला होता. त्यानंतर मल्लिकाच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र मल्लिकानं त्याचा इन्कार केला.