Join us

मल्याळम अभिनेत्री अत्याचार प्रकरण: आलिया भट्टने व्यक्त केल्या दु:खद भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 11:11 IST

मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करून तिची लैंगिक छेड काढल्याच्या घटनेविरोधात सर्वच स्तरातून टीका होत आहेत. संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या या ...

मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करून तिची लैंगिक छेड काढल्याच्या घटनेविरोधात सर्वच स्तरातून टीका होत आहेत. संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या या घटनेबद्दल बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्टने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली की, माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे मन सुन्न झाले आहे.एका कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली की, ‘मुळात अशा घटनांमुळे चीड येण्याऐवजी खूप दु:ख होते. हॉरर चित्रपटांत घडावे तसे प्रकार सर्रास आजुबाजूला घडताना मनात विचार येतोय की, एक सुसंस्कृत समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत. म्हणजे आता रस्त्यांवर फिरणेसुद्धा आता मुश्किल झाले आहे का?’मुलींवर होणारे अत्याचार थांबवावे तरी कसे हेच तिला कळत नाही. ती म्हणते, ‘अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता याबद्दल प्रश्न तरी नेमके कोणाला विचारावेत? असे का घडतेय हेच कळत नाहीए. मला तर आता माझ्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू लागली आहे. मला कधीच असे वाटले नव्हते की, एखाद्या अभिनेत्रीवर असा प्रसंग ओढावू शकतो.’‘त्या’ मल्याळम अभिनेत्रीला काही लोकांनी किडनॅप करून तिच्याशी गैरवर्तन केले होते. बराच वेळ गाडीत फिरवून मग तिला शहराच्या एका कोपऱ्यावर सोडून दिले. या घटनेमुळे मनोरंजन विश्व शॉक झाले आहे. अनेक नामवंत मंडळी या प्रकरणात सामील असण्याची शक्यता आहे. तिच्या समर्थनार्थ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत आल्यामुळे पोलिसांनीही प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.आलिया म्हणते, याविषयी मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण आधीच याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेलेले आहे, त्याची खूप चर्चा सुरू आहे. परंतु त्या पीडित मुलीला आपण प्रायव्हसी दिली पाहिजे. परंतु जे कोणी जबाबदार असतील त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे.ALSO READ: ​पाहा... आलिया भट्टला कसा पाहिजे जोडीदार