Join us

'मलंग' अॅक्ट्रेस दिशा पटानीला किसींग करण्यात येत नाही मजा, तर या गोष्टीत असतो जास्त रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 16:33 IST

जिथे जिथे दिशा जाते तिला तिच्या या धाडसी प्रयत्नाविषयी विचारले जाते. तेव्हा तिने अनेक गोष्टींचा खुलासाही केला. विशेष करून बोल्ड सीन्स देण्यावर तिने आपले मत मांडले.

आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून मलंग सिनेमामुळे चर्चेत आहेत. ते दोघे पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या सिनेमातआदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी स्काय डाइविंग, सबविंग, वॉटर काइटसर्फिंग, राइडिंग क्वॉडबाइक्ससारखे अनेक एडव्हेंचर स्पोर्ट्स करताना दिसणार आहेत. विविध अॅक्टीव्ह करूनही जास्त जास्त रंगते ती या दोघांनी सिनेमात केलेल्या किसींगची. अंडर वॉटर केलेल्या किसींग सीनने तर सा-यांनाच थक्क केले. त्यामुळे जिथे जिथे दिशा जाते तिला तिच्या या धाडसी प्रयत्नाविषयी विचारले जाते. तेव्हा तिने अनेक गोष्टींचा खुलासाही केला. विशेष करून बोल्ड सीन्स देण्यावर तिने आपले मत मांडले. 

मुळात जेव्हा कलाकारांना  किसिंग करताना पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटत असेन की, असे सीन्स देण्यात  मजा येत असेल, पण असे नसते.  जेव्हा तुम्ही असा सीन करत असता, तेव्हा तीन मोठे कॅमेरे तुमच्या आसपास लागलेले असतात. 50 लोक सेटवर असतात. जे तुम्हाला बारकाईने पाहत असतात. 10 लोक मॉनिटरमध्ये पाहात असतात. तर अशावेळी खूप प्रेशर असते. मुळात केवळ भूमिकेची गरज समजूनच अशा प्रकारचे सीन्स कलाकारांना द्यावे लागतात. राहिला माझा विषय तर असे बोल्ड सीन्स देण्यात मी  कुणासोबतच कंफर्टेबल नसते. कामा व्यतिरिक्त मला जास्त खाद्यपदार्थावर ताव मारायला आवडते. डायटिंग शेड्यूलदरम्यान जे चीट मील डे मिळतात, ते खूप मजेशीर असतात. 

टॅग्स :मलंगदिशा पाटनी