Join us

मलाइकाच्या प्रश्नावर अरबाज खान म्हणाला, ‘जीना इसी का नाम है’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 16:19 IST

पत्नी मलाइका आरोरा हिच्यापासून विभक्त झालेला अभिनेता अरबाज खान आता मलाइकाला त्याच्या आयुष्यातून कायमचा विसरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...

पत्नी मलाइका आरोरा हिच्यापासून विभक्त झालेला अभिनेता अरबाज खान आता मलाइकाला त्याच्या आयुष्यातून कायमचा विसरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका कार्यक्रमात जेव्हा त्याला मलाइकाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने अतिशय सूचकपणे यावर उत्तर देताना, ‘जीना इसी का नाम है’ असे म्हटले.अरबाजचा त्याच्या ‘जीना इसी का नाम है’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी पत्रकारांशी बोलत होता. यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला. मात्र जेव्हा त्याला मलाइकाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने अतिशय सूचक असे उत्तर दिले. तो म्हणाला की, व्यक्तिगत आयुष्यातील कुठल्याही प्रकारच्या कटू प्रसंगानंतर प्रत्येक व्यक्तीला पुढे जावेच लागते. अशावेळेस तुमच्याकडे दोन पर्याय असतात, एक तर तुम्ही त्याच विचारात राहून तुमचे आयुष्य व्यतित करा किंवा सगळेकाही विसरून आयुष्यात पुढे जा! मी त्यातील कुठला मार्ग निवडला असेल याचा अंदाज तुम्हाला कदाचित आलाच असेल, असेही तो म्हणाला. पुढे बोलताना अरबाज म्हणाला की, व्यक्तिगत आयुष्यात कुठलेही नुकसान असो. त्यात पैसा, परिवारातील एखाद्याचे निधन किंवा जवळच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचे दु:ख अशा स्थितीतही तुम्हाला आयुष्यात पुढे जावेच लागते असेही तो म्हणाला. यावेळी त्याने ‘जीना इसी का नाम है’ या सिनेमाविषयीही माहिती दिली. केशव पनेरी दिग्दर्शित ‘जीना इसी कान नाम है’ या सिनेमात अरबाजबरोबर हिमांश कोहली, मंजरी फडणीस, प्रेम चोपडा आणि सुप्रिया पाठक यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ३ मार्च रोजी रिलीज होणार आहे. मलाइकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने त्याच्या करिअरकडे लक्ष केंद्रित केले आहे.