Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stunning!! 46 वर्षांच्या मलायकाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, क्षणात व्हायरल झालेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 08:00 IST

मलायकाने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

ठळक मुद्देमलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण यापेक्षाही  तिचे फोटो आणि व्हिडीओमुळेच ती जास्त चर्चेत असते. तिच्या फिटनेसचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. सध्या मलायकाने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. होय, मलायकाने काल हे फोटो शेअर केलेत आणि लगेच ते व्हायरल झालेत.

46 वर्षांची मलायका या फोटोंमध्ये सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. शिमरी गाऊन आणि त्यावर लाईट मेकअप असा तिचा अंदाज  आहे. या ड्रेसवर मलायकाने ग्रीन कलरची ज्वेलरी कॅरी केली आहे.

मलायकाचे हे ताजे फोटो पाहून चाहते इतके क्रेजी झालेत की, काहीच तासांत या फोटोंना 70 हजारांवर लाईक्स मिळालेत.

मलायका सतत काहीना काही कारणाने चर्चेत असते. परवा तिने  इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती एक कठिण योग करताना दिसत होती.

विशेष म्हणजे मलायकाच्या या व्हिडीओवर अर्जुन कपूरचा काका अभिनेता संजय कपूरनं कमेंट केली होती. यशिवाय फराह खाननं सुद्धा मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट केली होती.

मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. तिचे हे फोटो त्याचा पुरावा आहेत.

टॅग्स :मलायका अरोरा