Join us

विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'मध्ये मलायका अरोराची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 11:05 IST

मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब होती. मात्र आता अशी माहिती मिळतेय की, लवकरच ती आयटम साँग करताना दिसणार आहे. विशाल भारव्दाज यांच्या आगामी सिनेमात ती आयटम साँग करण्याससाठी तयार झाली आहे.  

ठळक मुद्देविशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे चरण सिंग पथिक यांच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारित आहे

मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब होती. मात्र आता अशी माहिती मिळतेय की, लवकरच ती आयटम साँग करताना दिसणार आहे. विशाल भारव्दाज यांच्या आगामी सिनेमात ती आयटम साँग करण्याससाठी तयार झाली आहे.  

विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चरण सिंग पथिक यांच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाची कथा राजस्थानमधील दोन बहीणींची भवती फिरणारी आहे. बडकी आणि छुटकी नावाच्या दोन बहिणी नेहमी एकमेकींशी भांडत असतात. मात्र लग्न झाल्यावर त्यांना कळते की त्या एकमेकींशिवाय राहु शकत नाही. हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे. यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सुनील ग्रोव्हर आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  

विशाल भारव्दाज या सिनेमातून प्रेक्षकांना सरप्राईज द्यायला तयार झाला आहे. विशाल म्हणाले, आम्हाला आधीपासून माहिती आहे की, सान्या मल्होत्रा आणि राधिका खूप चांगल्या अभिनेत्री आहेत.भारव्दाज मलायकाला घेऊन काही तरी स्पेशल आयटम नंबर करायच्या तयारीला लागले आहेत. ती यात 'हलो हलो' या गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे बोल ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी लिहिले आहेत तर कोरियॉग्राफी गणेश आचार्य करणार आहे. या आठवड्यापासून गाण्याची शूटिंग सुरु होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादचं राधिकाचे भविष्य ठरवणार आहे.

विशाल भारव्दाज यांच्या इतर सिनेमाबाबत बोलायचे झाले तर गँगस्टार सपना दीदीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा घेऊन येतो आहे. हुसेन जायेदीचे पुस्तक "माफिया क्वीन ऑफ मुंबई" ह्यावर आधारित असून ही एक सत्यघटनावर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहिमा खानची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार होती. इरफान खानदेखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता. इरफान यात दाऊदची भूमिका साकारणार होता. मात्र इरफानला उपचारासाठी परदेशी रवाना झाल्याने सिनेमाचे शूटिंग रखडले.  

टॅग्स :मलायका अरोरा