Join us
Daily Top 2Weekly Top 5

 मला परत घेऊन चल...! मलायका अरोराचा लाडीक हट्ट अन् अर्जुन कपूरचे उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 13:02 IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. अर्थात  दोघांनी हे रिलेशनशिप मान्य केले नाही. पण जगाला दाखवण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. मलायकाची ताजी पोस्ट तर बरेच काही सांगणारी आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. अर्थात  दोघांनी हे रिलेशनशिप मान्य केले नाही. पण जगाला दाखवण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. मलायकाची ताजी पोस्ट तर बरेच काही सांगणारी आहे. होय, नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मलायकाने एका व्हॅकेशनचा जुना फोटो शेअर केला. ‘मला परत घेऊन चल...,’असे कॅप्शन मलायकाने या पोस्टला दिले. मलायकाच्या या पोस्टवर अर्जुनने फार काही लिहिले नाही. केवळ ‘hmmm’ असे लिहिले. पण त्याच्या या ‘hmmm’ मध्येच सगळे काही आले. कदाचित ‘मला परत घेऊन चल...,’ या मलायकाच्या मागणीवर अर्जुन गंभीरपणे विचार करतोय.

यानंतर अर्जुननेही आपला एक फोटो पोस्ट केला. ‘हॉलिडेवर चांगल्या पोझ ज्या. जेणेकरून परतल्यावर इन्स्टाग्रामवर शेअर करायला खूप सारे फोटो असतील,’असे त्याने लिहिले. त्याच्या व अर्जुनच्या या दोन्ही फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, दोघांचेही फोटो ‘मिलान’चे आहेत. होय, याच ठिकाणी अर्जुन व मलायका एकत्र व्हॅकेशनवर गेले होते. अर्थात हा व्हॅकेशन प्लान सीक्रेट होता. पण हळूहळू या सीक्रेट प्लानचे एक एक सत्य बाहेर येऊ लागले आहे. हे दोन्ही फोटोही त्यातलेच.

अलीकडे हे कपल  संजय कपूर यांच्या न्यू ईअर पार्टीत हातात हात घालून दिसले होते.  या पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली होती. केवळ इतकेच नाही तर एका फ्रेममध्ये अर्जुन मलायकाच्या खांद्यावर हात टाकून उभा असलेलाही दिसला होता.यापूर्वी अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले होते. या पार्टीतही अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून पोहोचले होती. या गाडीत मलायका अर्जुनच्या मागच्या सीटवर होती तर अर्जुन कपूर ड्राईव्ह करताना दिसला होता. अर्जुनच्या बाजूच्या सीटवर त्याचे काका संजय कपूर होते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर