Join us

लाल साडी अन् केसात गजरा..! रेड कार्पेटवर मलायका अरोराचा देसी जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:25 IST

अभिनेत्री मलायका अरोराच्या देसी लूकवर चाहते होतायेत फिदा

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा जास्त वेस्टर्न आऊटफिटमध्येच पहायला मिळते. मात्र यावेळी ती देसी लूकमध्ये रेड कार्पेटवर पहायला मिळाली. यावेळी मलायकाने फक्त साडीच परिधान केली नव्हती तर ट्रेडिशनल ज्वेलरी आणि केसात गजरादेखील माळला होता.

मुंबईतील वांद्रे येथे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मलायका अरोराने हजेरी लावली होती. यावेळी मलायकाने पाटन पटोला प्रिंटची साडी परिधान केली होती.

लाल रंगाची साडीवर व्हाईट आणि निळ्या व पिवळ्या रंगाची प्रिंट होती.ही साडी संगीता खिलाचंदच्या कलेक्शनमधील होती. या साडीत मलायका खूपच सुंदर दिसत होती.

साडीला मॉडर्न टच देत मलायकाने ट्रेडिशनल स्टाईलच्या जागी काळ्या रंगाचा क्रॉप टॉप डिझाईनचा कॉम्फी ब्लाऊज परिधान केला होता या ब्लाऊजचा हात थ्री फोर्थ लेंथचा होता.

या लूकसोबत मलायकाने मेटॅलिक ज्वेलरी कॅरी केली होती. या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. साडीवर मलायकाने सिम्पल हेअरस्टाईल केली होती आणि केसात गजरा माळला होता.

इतकेच नाही तर कपळावर टिकलीदेखील लावली होती. तिचा हा देसी अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे.

तिच्या लूकवर बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसोबत चाहतेदेखील कमेंट करत आहेत. 

टॅग्स :मलायका अरोरा