अंबानींच्या पार्टीत शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या मलाइका अरोराला म्हटले, आंटी आता बस करा, तुमचं पोरगं जवान झालं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:22 IST
अंबानीच्या पार्टीत शॉर्ट ड्रेस घालून आलेल्या मलाइकाचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटकºयांनी तिला या फोटोंवरून ट्रोल केले.
अंबानींच्या पार्टीत शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या मलाइका अरोराला म्हटले, आंटी आता बस करा, तुमचं पोरगं जवान झालं!
नुकतेच अंबानी परिवारातर्फे एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ईशा अंबानी यांनी दिलेल्या या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र जेव्हा मलाइका अरोराने पार्टीत हजेरी लावली तेव्हा उपस्थित तिला बघून दंग राहिले. मलाइकाने पार्टीत झिनी वेलवेटचा शॉर्ट ड्रेस घातला होता. त्यावर एक फ्लोर लेंथ केप घेतला होता. ४४ वर्षीय मलाइका रेड लिपस्टिकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचा जलवा बघण्यासारखा होता. दरम्यान, जेव्हा मलाइकाने पार्टीत हजेरी लावली, तेव्हा तिचे हा शॉर्ट ड्रेसमधील सौंदर्य बघून सर्वच दंग झाले. मलाइकाचे या अवतारातील काही फोटोज् सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले. परंतु नेटकºयांनी तिला नेहमीप्रमाणे या फोटोवरून ट्रोल केले. एका युजर्सनी लिहिले की, ‘आता चेहºयाची प्लास्टिक सर्जरी करून घे. आंटी आता बस करा, पोरगं जवान झालं आहे.’ तर दुसºया एका युजरने म्हटले की, ‘हे तुझ्या मुलासाठी चांगले नाही’ मलाइकांच्या या फोटोंना दिवसभर अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स दिल्या गेल्या. वास्तविक कपड्यांवरून मलाइकाला ट्रोल करणे काही नवे नाही. यापूर्वीदेखील तिला बºयाचदा कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले. मात्र मलाइका याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे तिने बºयाचदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, मलाइकाने याचवर्षी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. मलाइका आणि अरबाजचा १५ वर्षांचा मुलगा असून, त्याचे नाव अरहान खान आहे. अरहानची कस्टडी मलाइकाकडे आहे. सध्या मलाइका इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी आगामी काळात ती काही रिअॅलिटी शोला जोडली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ‘दबंग’ सीरिजमध्येही ती पुन्हा सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे.