Join us

मलायका अरोराने पूर्ण केली वयोवृद्ध चाहत्याची इच्छा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 15:35 IST

आपल्या स्टनिंग लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्देसध्या मलायका व अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे.

आपल्या स्टनिंग लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत मलायका एका चाहत्याची इच्छा पूर्ण करताना दिसतेय. होय, मलायका योगा क्लाससाठी जात असताना एका चाहत्याने तिच्याकडे सेल्फीची मागणी केली. मलायकाने कुठलेही आढेवेढे न घेता, चाहत्यासोबत सेल्फी घेतला. खरे तर सेल्फीची विनंती करणारा चाहता मनातून थोडा घाबरला होता. अशात मलायका स्वत: थोडी त्याच्या जवळ गेली आणि मोबाईल अँगल सेट करून त्याच्यासोबत सेल्फी घेतला. यानंतर चाहत्याचे आभार मानत, मलायका योगा क्लाससाठी पुढे निघाली. येथे हजर असलेल्या फोटोग्राफर्सलाही मलायकाने पोज दिली.

सध्या मलायका व अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. त्यातच मलायकाने आपल्या ड्रिम वेडिंगचा खुलासा करून या चर्चांना बळ दिले आहे. ताज्या मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचे तिचे ड्रिम वेडिंग कसे असेल ते सांगितले.  माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते, असे ती म्हणाली होती.

मलायका घटस्फोटित आहे. शिवाय तिच्यापेक्षा अर्जुन  11 वर्षांनी लहान आहे. याऊपरही अर्जुन व मलायका यांची लव्हस्टोरी बहरली. दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या नात्याची जाहीर कबुली दिली होती.

टॅग्स :मलायका अरोरा