अभिनेत्री, मॉडेल, योग मास्टर मलायका अरोरा (Malaika Arora) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. सर्वात जास्त तिच्या फिटनेसचं कौतुक केलं जातं. मलायका बिझनेसवुमनही आहे. तिचं मुंबईत स्वत:चं रेस्टॉरंट आहे. तर आता नुकतंच तिने मुंबईतील एक फ्लॅट विकला. यातून तिला कोट्यवधीचा नफाही झाला आहे. गेल्या महिन्यातच मलायकाने ही डील केली.
मलायकाने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स स्थित रनवाल एलिगेंटमधील एक फ्लॅट विकला आहे. या फ्लॅटचा कार्पेट एरिया १३६९ चौरस फुट आहे. फ्लॅटसोबत पार्किंगसृ स्पेसही आहे. ३१.०८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरली आहे. मलायकाने २०१८ साली मार्च मध्ये हा फ्लॅट ३.२६ कोटी रुपयांना घेतला होता. फ्लॅटच्या किंमतीत २.०४ कोटींची वाढ झाली आहे. मलायकाने ५.३० कोटींना हा लक्झरी फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड, उपनगरीय रेल आणि वर्सोवा घाटकोपर मेट्रो कॉरिडोर ला कनेक्टेड आहे.
मलायकाच्या कामाबद्दल बोलायचं तर टीव्हीवरील डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत असते. आयुषमान खुरानाच्या आगामी 'थामा'सिनेमात मलायकाचं आयटम साँग असणार आहे. तसंच तिचे योगाचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. वैयक्तिक आयुष्यात मलायका अनेक वर्ष अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र गेल्या वर्षीच त्यांचं ब्रेकअप झालं.