Join us

लॉकडाऊनदरम्यान अशी झाली आहे मलायकाची अवस्था, फोटो शेअर करत मनातील घालमेल केली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 16:47 IST

सारेच कोरोनामुळे घरात बंदिस्त झाले आहेत. अशात मलायकाला आता एकटेपणा सतावू लागला आहे.

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत रसिकांची पसंती मिळवत असते. सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्यामध्ये देखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. कधी कुकिंग करताना दिसते तर कधी घरातच वर्कआऊट करत इतरांनाही प्रेरणा देत असते. नेहमी हसत खेळत मूडमध्ये असणारी मलायकाच्या चेह-यावरील हसू गायब झाले आहे. 

देशात तिस-या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. सारेच कोरोनामुळे घरात बंदिस्त झाले आहेत. अशात मलायकाला आता एकटेपणा सतावू लागला आहे. सोशल मीडियावर तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत त्यांची आठवण येत असल्याचे तिने म्हटले आहे. गेल्या ५० दिवसांपासून मलायका आई-वडिलांना भेटली नसल्यामुळे आता तिला अधिक चिंता वाटू लागली आहे. 

अभिमेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही.  “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं आहे. जे काही झालं चांगलंच झालं हे सांगायलाही ती विसरली नाही. सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. 

टॅग्स :मलायका अरोरामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस