Join us

मलायका- अर्जुनचे ‘रोमॅन्टिक’ सेलिब्रेशन, ‘हा’ फोटो शेअर करत केले नव्या वर्षाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 13:49 IST

खुल्लमखुल्ला...!!

ठळक मुद्देअर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली.

बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात आताश: आकंठ बुडालीये. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. आधी दोघांनीही जगापासून लपवून ठेवले, पण आता दोघेही अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करतात. सध्या मलायकाने असाच एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून नेहमीप्रमाणे काहींनी मलायका व अर्जुनला ट्रोलही केलेय. पण या फोटोचे कौतुक करणारेही बरेच चाहते आहेत.

न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी सध्या हे लव्ह बर्ड्स गोव्यात आहेत. गोव्यात धम्माल मस्ती केल्यानंतर दोघांनीही एकत्र नव्या वर्षाचे स्वागत केले. मलायकाने यावेळी अर्जुनसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला. ‘ही नवी सकाळ आहे, हा नवा दिवस आहे, हे नवे वर्ष आहे... 2021,’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

याआधी असाच एक व्हॅकेशनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत अर्जुन व मलायकाने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्याआधी करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.

शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. . मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर