Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील तणावामुळे विमानसेवा विस्कळीत; दुबईत अडकलेल्या मलायकाच्या आईने सांगितला थरारक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:25 IST

मी माझ्या डोळ्यांनी आकाशात..., काय म्हणाली मलायकाची आई?

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बसला असून जगाच्या विविध भागांतील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक विमानांचे मार्ग बदलल्यामुळे हजारो भारतीय पर्यटक दुबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. विमानसेवा पुन्हा सुरळीत होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांची आई जॉयस अरोरा या देखील सध्या दुबईत अडकल्या आहेत.

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना जॉयस अरोरा म्हणाल्या, "माझ्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी दुबईत आले होते. माझा परतीचा प्रवास ३ मार्च रोजी नियोजित होता, परंतु युद्धामुळे विमान रद्द झाल्याचा अधिकृत मेसेज आला आणि मी इथेच अडकून पडले. 

दुबईतील परिस्थितीबद्दल बोलताना जॉयस यांनी एका भयंकर अनुभवाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "मी माझ्या डोळ्यांनी आकाशात क्षेपणास्त्रे रोखताना पाहिली, जे अत्यंत भीतीदायक होते. मात्र, दुबईचे लष्कर आणि प्रशासन अत्यंत चोख काम करत असून मी येथे सुरक्षित आहे."

मुंबईत असलेल्या मलायका आणि अमृता या दिवसातून ३-४ वेळा फोन करून आपल्या आईची विचारपूस करत आहेत. लवकरच विमानसेवा पूर्णपणे सुरू होईल आणि आपण मायदेशी परतूत अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

जॉयस अरोरा दुबईत अडकलेल्या असतानाच, दुसरीकडे अभिनेत्री ईशा गुप्ता मात्र सुखरूप भारतात परतली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. ईशाने म्हटले की, "मी सुरक्षितपणे घरी पोहोचले आहे. आम्ही ज्या परिस्थितीचा सामना केला तो काळ खूप कठीण होता, पण सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादाने मी सुखरूप आहे." शिवाय ईशापाठोपाठ अभिनेत्री सोनल चौहानही दुबईहून भारतात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Middle East Tension Disrupts Flights: Malaika's Mother Stranded in Dubai

Web Summary : Middle East conflict disrupts flights, stranding tourists in Dubai. Malaika Arora's mother, Joyce, recounts witnessing missile interceptions. Actress Esha Gupta safely returned home. Uncertainty looms over flight resumption.
टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडदुबई