Join us

Malaika Arora : मलायकाला लवकर करायचंय लग्न...! अर्जुन कपूर नाही तर ‘हे’ आहे खरं कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:37 IST

Moving In With Malaika, Malaika Arora : होय, मलायकाला लवकरच लग्न करायचं. अर्थात याचं कारण अर्जुन कपूर नाही तर भलतंच आहे.  

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विद मलायका’ (Moving In With Malaika ) या शोमुळे चर्चेत आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये मलायकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अगदी लव्ह लाईफपासून, सेक्स लाईफपर्यंत सगळ्या विषयांवर ती बोलली. आता ती लग्नावर बोलली आहे. होय, मलायकाला लवकरच लग्न करायचं. अर्थात याचं कारण अर्जुन कपूर नाही तर भलतंच आहे.

नुकत्याच झालेल्या ‘मूव्हिंग इन विद मलायका’ एपिसोडमध्ये मलायकाने  तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला. या एपिसोडमध्ये मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा एका हॉटेलमध्ये जाताना दिसतात. त्यानंतर काही फोटो क्लिक करुन त्या ऑर्डर देतात. त्याचवेळी मलायकाच्या हातातील बांगड्याकडे अमृताचं लक्ष जातं. मलायका तिला या बांगड्या डायमंडच्या असल्याचं सांगते. त्याक्षणी अमृताला तिच्या आईच्या हिऱ्याच्या बांगड्यांची आठवण होते. आपली आई आपल्या दोघींपैकी एका आवडत्या मुलीला तिच्या हिऱ्याच्या बांगड्या देणार आहे, असं अमृता मलायकाला सांगते. यावर, ‘आपल्या दोघींमध्ये जर पुन्हा कोणी लग्न करणार असेल, तर ती मी आहे. मी लवकरच लग्न करणार आहे. त्यामुळे या बांगड्यांवर माझा हक्क आहे,’असं मलायका म्हणते.

एकंदर काय तर आईच्या हिऱ्याच्या बांगड्यांसाठी का होईना मलायकाने लग्नाचा विचार मनावर घेतला आहे. मी लवकर लग्न करणार आहे, असंही ती म्हणणेय. आता मलायका व अर्जुन कधी एकदा लग्नबंधनात अडकतात, ते बघूच. मलायका सध्या  अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत आहेत. दीर्घकाळापासून  त्यांच्या लग्नाचीही चर्चा आहे. आता मात्र मलायकाने ती पुन्हा दुसरं लग्न करणार असल्याचं बहिणीकडे सांगितलं असल्याने हे लग्न लवकरच होणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर