Join us

अखेर अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच उघडपणे बोलली मलायका अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:10 IST

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरु आहे. कोण लग्नाच्या बेडीत अडकतेय तर कुणाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा आहे.

ठळक मुद्देअर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत तिने कार्यक्रमात दिले

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरु आहे. कोण लग्नाच्या बेडीत अडकतेय तर कुणाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. दोघे डिनर डेटपासून ते दिवाळी पार्टीमध्ये सगळीकडे दोघे एकत्र दिसले. पूर्वी मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर पळणारे हे जोडपे सध्या मीडियाच्या समोर हातात हात घालून फिरतात.  मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी हे कपल लग्न करणार आहे.  

अलीकडे ‘कॉफी विद करण 6’च्या सेटवर आमिर खानसोबत काही काळ मलायका अरोरा ही सुद्धा दिसली आणि तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाच्या चर्चेला आणखी जोर चढला. यादरम्यान मलायकाला गमतीने छेडताना करण जोहर ‘इशारों इशारों मे’ बरेच काही बोलून गेला. मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत त्याने या कार्यक्रमात दिले.   

 एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. मलायका म्हणाली, ''मी कधी वैयक्तिक प्रश्नांची उत्तर देत नाही. त्याच कारण हे नाही की मला उत्तर द्यायला लाज वाटते, त्याच कारण हे आहे की मी वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करण्यासाठी कम्फर्टेबल नाही. माझ्या आयुष्यात जे काही आहे ते सगळ्यांच माहिती आहे. याबाबत मला कोणतीच चर्चा करायची नाही. मी माझं आयुष्य एन्जॉय करतेय.''  

अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरताना दिसत आहेत. मलायकाने आपला वाढदिवस खास अर्जुनसोबत साजरा केला होता

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर