मलायका अरोरा ही बॉलिवूडमधली लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण बॉलिवूडमधील करिअरपेक्षा मलायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाचं लव्ह लाइफ हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अर्जुन कपूरसोबतचं मलायकाचं रिलेशनशिप गाजलं होतं. आता मलायकाचं नाव एका बिजनेसमॅनसोबत जोडलं जात आहे. अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
मलायकाचं नाव हिरा व्यापारी असलेल्या हर्ष मेहतासोबत जोडलं जात आहे. मलायका आणि हर्ष मेहताचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये हर्ष मेहता सेल्फी घेताना दिसत आहे. तर त्याच्या बाजूला एक मुलगी उभी असल्याचं दिसत आहे. ती मुलगी म्हणजे मलायकाच असल्याचं म्हटलं जात आहे. रोममधील हे फोटो असल्याचा दावा रेडिटवर केला जात आहे. मलायकाने हर्षसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केल्याचं म्हटलं जात आहे. मलायका आणि हर्षमध्ये तब्बल १९ वर्षांचं अंतर आहे. मलायका ५२ वर्षांची आहे तर हर्ष ३३ वर्षांचा आहे.
हर्षआधी मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे लिव्ह इनमध्येही राहत होते. अर्जुन कपूर आणि मलायकामध्ये १२ वर्षांचं अंतर होतं. मलायकाने अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. मात्र २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे.
Web Summary : Malaika Arora is rumored to be dating businessman Harsh Mehta, 19 years her junior, after photos surfaced online. This follows her relationship with Arjun Kapoor. Malaika was previously married to Arbaz Khan.
Web Summary : मलाइका अरोड़ा के बारे में अफवाह है कि वह बिजनेसमैन हर्ष मेहता को डेट कर रही हैं, जो उनसे 19 साल छोटे हैं, तस्वीरें ऑनलाइन सामने आने के बाद। यह अर्जुन कपूर के साथ उनके रिश्ते के बाद है। मलाइका ने पहले अरबाज खान से शादी की थी।