Join us
Daily Top 2Weekly Top 5

Uff ...! बिनधास्त मलायका अरोराने पुन्हा शेअर केलेत हॉट फोटो; एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:47 IST

काही तासांत हजारो लाईक्स...

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अर्जुनला किस करतानाचा फोटो मलायकाने शेअर केला होता. यावरूनही मलायका ट्रोल झाली होती.

मलायका अरोराचे नवे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. होय, या नव्या फोटोशूटमध्ये मलायकाने अशा काही हॉट पोज दिल्या आहेत की, बघणारेही घायाळ झालेत. मलायकाच्या डाय हार्ट फॅन्सनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केलाय. पण काहींनी नेहमीप्रमाणे यावरून मलायकाला ट्रोलही केलेय. या फोटोंमध्ये मलायकाने ब्लॅक कलरचा डीप नेक टॉप आणि ब्लॅक ट्राऊजर घातला आहे. हे फोटो इतके हॉट आहेत की, काही तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळालेत. क्षणात हे फोटो व्हायरल झालेत.

नेहमीप्रमाणे काहींना मलायकाचा हा बोल्ड अंदाज भावला तर काहींनी तिचा हा हॉट अवतार पाहून तिला ट्रोल केले. आंटी, आपको ये शोभा नहीं देता, अशा शब्दांत अनेकांनी तिला लक्ष्य केले.

खरे तर आत्तापर्यंत अनेकदा मलायका आपल्या हॉट फोटोंमुळे ट्रोल झालीय. प्रत्येकवेळी ट्रोलर्सनी तिला नाही नाही ते ऐकवले. पण ट्रोलर्सच्या या कमेंट्सची पर्वा करतेय कोण? जगाची पर्वा न करता बिनधास्त मलायकाने  हॉट फोटो शेअर करण्याचे थांबवले नाही.

अगदी अलीकडे एक फोटो शेअर करत, ‘टॉक टू द हॅन्ड...’  अशा शब्दांत ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. 

मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. अर्थात अद्याप या लग्नाला मुहूर्त सापडलेले नाही. मलायका व अर्जुन बिनधास्त फिरताना दिसतात. अगदी खुल्लमखुल्ला रोमान्स करतात.

काही दिवसांपूर्वी अर्जुनला किस करतानाचा फोटो मलायकाने शेअर केला होता. यावरूनही मलायका ट्रोल झाली होती. पण शेवटी तेच, जगाची पर्वा करतेय कोण?

टॅग्स :मलायका अरोरा