Join us

अर्जुन कपूरसोबत हिमाचलमध्ये आहे मलायका अरोरा, अशी करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 11:05 IST

मलायका सध्या हिमाचलमध्ये आपले मिनी व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

अर्जुन कपूर सध्या आपला आगामी सिनेमा 'भूत पोलिस'च्या शूटिंगसाठी धर्मशाळामध्ये आहे. अर्जुन कपूरसोबत दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी मलायका अरोरा सुद्धा तिथे पोहोचली होती. मलायका सध्या हिमाचलमध्ये आपले मिनी व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. सोशल मीडियावर ती तिकडचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मलायकाने तिथला लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. ज्यात ती व्हाइट रोब घातलेली दिसतेय. 

मलायकाने फोटो सोबत लिहिले आहे,  'रोब, हॉट कप्पा, पिक टेढ़ा है, पर अच्छा है.' मलाकाने या फोटो करिना कपूरसुद्धा टॅग केले आहे, कारण करिनाने तिचा हा फोटो क्लिक केला आहे. 

मलायका आणि अर्जुन एकमेकांना दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करतायेत.  काही दिवसांपूर्वी चाहत्यांशी झालेल्या संवाद दरम्यान अर्जुनला मला विचारण्यात आले होते की मलायकाशी लग्न कधी करणार आहे?अर्जुन म्हणाला होता, 'मी लग्न करेन तेव्हा मी सर्वांना सांगेन. आत्ताच लग्नाचे कोणतेही नियोजन नाही आणि आता जरी मी लग्न करण्याचा प्लान केला तरी शक्य नाही. आम्ही दोघांनी लग्नाबाबत काही विचार केलेला नाही. मी नेहमीच सांगतो की, मी जेव्हा लग्न करेन तेव्हा नक्की सगळ्यांना सांगेन. 

याशिवाय अर्जुनला फॅनकडून विचारण्यात आले की, मलायका इतर लोकांपेक्षा कशी वेगळी आहे. यावर, अभिनेताने उत्तर दिले की, जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करता तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड होते कारण फक्त एक गोष्ट त्यांना इतरांपासून विभक्त करत नाही. बर्‍याच गोष्टी वेगळ्या असतात. मला वाटते मलायका मला चांगल्या प्रकारे ओळखते. मी एक असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत राहणं खूप कठीण आहे. मी मुळीच आरामात जगू शकत नाही. अशा परिस्थितीत मलाइकाचा संयम माझ्यासाठीसुद्धा खूप मोठा आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर