Join us

मालदीवमध्ये मलायका करतेय मजा-मस्ती, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 11:48 IST

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या चर्चेमुळे चर्चेत आहेत. सध्या मलायका मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

ठळक मुद्देमलायकाने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहेसध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या चर्चेमुळे चर्चेत आहेत. सध्या मलायका मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोशल मीडियावर मलायकाचे व्हॅकेशनवरचे फोटो व्हायरल होतेय. या फोटोंमध्ये मलायकाचे अंदाज खूपच बोल्ड आहे. 

मलायकाने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका सायलिंग करताना दिसतेय. मलायकाचा हा स्लो मोशन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

मिळालेल्या माहितीनुसार  मलायका आणि अर्जुन 19 एप्रिलला लग्न करणार असून त्या दोघांचे जवळचे मित्रमैत्रीण या लग्नाला उपस्थित राहाणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत करिना कपूर खान, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर