Join us

अर्जुन कपूरच्या शर्टलेस लूकवर गर्लफ्रेंड मलायका झाली फिदा, दिली अशी काही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:45 IST

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपला आगामी सिनेमा 'पानीपत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आपल्या आगामी सिनेमासाठी अर्जुन कपूर तासन तास वर्कआऊट करतोय

ठळक मुद्देअर्जुन कपूरने वर्कआऊट करतानाच फोटो सोशल मीडियावर शेअर केलागर्लफ्रेंड मलायका अरोराने त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपला आगामी सिनेमा 'पानीपत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आपल्या आगामी सिनेमासाठी अर्जुन कपूर तासनतास वर्कआऊट करतोय. अर्जुन कपूरने वर्कआऊट करतानाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अर्जुन कपूरने त्याची कथित गर्लफ्रेंड मलायका अरोराने त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे.  

अर्जुन कपूरने या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे, मी पानीपतच्या युद्धासाठी सज्ज झालो आहे.या फोटोला मलायकाने इमोजी दिले आहेत. पानीपतबाबत बोलायचे झाले तर  सिनेमाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. तर बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे पानिपत या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे. तर  पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे.  ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा